Unseasonal Rain Damage : द्राक्ष पंढरी असे बिरुद मिरवणाऱ्या निफाडमधील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, कांद्यापाठोपाठ आता द्राक्ष उत्पादक शेतकरीही अस्मानी, सुलतानी संकटाने हतबल झाला आहे. (Unseasonal Rain Damage After onions grape producers desperate cost of production not good nashik news)
द्राक्ष विकली जात नाहीत आणि रोजच पाऊस व गारपिटीचा जोरदार तडाखा सुरू आहे. माल तयार आहे; पण व्यापारी घ्यायला तयार नाही. व्यापाऱ्याला फोन केला, तर १५ ते २० रुपये किलोप्रमाणे भाव मिळेल, असे सुनावले जाते.
पाऊस व गारपीटीच्या भीतीने शेतकरी हा भावदेखील स्विकारायला तयार होत माल घेऊन जाण्यासाठी विनवणी करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी मातीमोल भावाने कांदा विक्री करावा लागला.
त्यामुळे कांद्यातदेखील शेतकऱ्याला उत्पादन खर्च निघणे दुरापास्त झाले होते. बदलत्या वातावरणामुळे पुन्हा एकदा द्राक्ष पंढरीतील शेतकऱ्यांपुढे तीच परिस्थिती उभी ठाकली आहे.
गेल्या काही वर्षांपासून द्राक्षशेतीला उतरती कळा लागली आहे. दिवसेंदिवस रोग वाढत आहेत. मजुरी वाढली आहे. डिझेलचे भाव असो किंवा खते, औषधांच्या किमतीदेखील दरवर्षी वाढतच आहे. त्यातून मागील पंधरा ते वीस वर्षांत एकरी खर्च पाच पटीने वाढला आहे.
त्या तुलनेत द्राक्षाचे भाव दुप्पटसुद्धा झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाला. बँका, सोसायटीचे कर्ज थकले. पुढचा हंगाम चांगला जाईल, अशा भाबड्या आशेतून दुसऱ्या पिकातून निघणारे पैसे द्राक्षबागेचे भांडवलात गुंतवले.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
परंतु आज जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची अशी वाईट परिस्थिती झालेली आहे. कुटुंबकबिला संभाळण्याबरोबरच मुलांचे शिक्षण, विवाह, इतरांची देणी आदी कसे भागवायचे? याची भ्रांतदेखील बळीराजाला पडली आहे.
चार ते साडेचार महिन्यात द्राक्ष विक्री होऊन रान खाली होणे आवश्यक असते. परंतु, साडेपाच ते सहा महिन्यांपासून अद्यापही रान खाली झालेले नाही. शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना भरीव मदत करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
"शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम तोट्यात चालला आहे. पुढील वर्षाच्या हंगामासाठी भांडवल कसे उभे करावे, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. बदलते नैसर्गिक वातावरण आणि शेतीमालाची होणारी वाताहत, मिळणारा भाव यातून कसे बाहेर पडायचे हेच सुचेनासे झाले आहे." - बाबुराव सानप, सोनेवाडी, निफाड
"गेल्या महिन्याभरापासून पाण्याच्या रोटेशनप्रमाणे वादळी पाऊस आणि गारपीट होत आहे. त्याचा मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. कवडीमोल दराने विकणाऱ्या द्राक्षांतून उत्पादन खर्चदेखील फिटत नसल्याने कुटुंबकबीला कसा चालवायचा? हा यक्ष प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला आहे." -कृष्णा शिंदे, भेंडाळी, निफाड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.