Unseasonal Rain Damage : कसबे सुकेणे व परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच बेदाणाधारक उत्पादकांनाही अवकाळी पावसाचा मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांचा हजारो टन बेदाणा पावसात भिजल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. (Unseasonal Rain Damage difficult to get price due to deterioration of raisins nashik news )
कसबे सुकेणे व परिसराला बेदाण्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते परिसरात जवळपास १०० च्या वर मोठे बेदाणा शेड असून या बेदाणा शेडमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षमण्यांसह द्राक्ष घड टाकण्यात आले होते. द्राक्षाला भाव नसल्याने व पावसामुळे अनेक द्राक्ष खराब झाल्यानंतर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपले द्राक्ष म्हणी व द्राक्ष बागा व्यापारी घेत नसल्याने बेदाणाधारक व्यवसायिकांना दिले होते.
मात्र बेदाणा शेडमध्ये पुरेशी जागा नसल्याने अनेक बेदाणा धारक व्यावसायिकांनी शेडच्या बाहेरच बेदाणे उन्हामध्ये वाळत घातले होते, एवढे मोठे तयार होत असलेले बेदाणे ठेवायचे कुठे व जास्त पावसामुळे ते झाकणे ही शक्य नसल्याने बेदाणा उत्पादकांना तयार होत असलेले बेदाणे बाहेरच ठेवावे लागले.
परिणामी सततच्या पावसामुळे ते बेदाणे ओले झाले असून त्यांची प्रत खालावली असल्याने त्यांना अपेक्षित भाव मिळण्याची शक्यता खूप कमी असल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
बऱ्याचशा बेदाणाधारक व्यावसायिकांनी सरासरी १० रुपयापासून ते १७ रुपयापर्यंत द्राक्षमणी व द्राक्ष बागा खरेदी केल्या होत्या बेदाणाधारक उत्पादकांनीही मोठ्या प्रमाणात खासगी व सरकारी बँकांचे कर्ज काढलेले आहे.
त्यामुळे बेदाण्याला अपेक्षित भाव न मिळाल्यास बँकांचे कर्ज फेडण्याची शाश्वती कमी असल्याचे म्हणणे बेदाणा व्यावसायिकांची आहे.
"अवकाळी पावसामुळे आमच्या प्रमाणेच अनेक बेदाणा व्यावसायिकांचे तयार होत असलेला बेदाणा पावसात भिजल्याने बेदाण्याची प्रत खालावणार आहे. परिणामी अशा बेदाण्याला योग्य भाव मिळण्याची शाश्वती कमी असल्याने बेदाणा व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. सरकारने बेदाणा व्यावसायिकांनाही मदत करावी."
-दर्शन देशमुख, बेदाणा व्यावसायिक, कसबे सुकेणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.