Unseasonal Rain Damage : साहेब, अवकाळीमुळे होत्याचे नव्हते झाले; शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

Babanrao uncle Sakharchand Bachchav with Dilip Borse while inspecting the damaged house of Bhausaheb Bachchav in Navi Shemli.
Babanrao uncle Sakharchand Bachchav with Dilip Borse while inspecting the damaged house of Bhausaheb Bachchav in Navi Shemli.esakal
Updated on

Unseasonal Rain Damage : बागलाण तालुक्यात मंगळवारी (ता.२३) अवकाळी पाऊस, वादळी वारा, वीजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने जुनी शेमळी, नवी शेमळी, आराई, नागझरी, किरायतवाडी, कॅनॉल चौफुली आदी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

बुधवारी (ता. २४) बागलाणचे आमदार दिलीप बोरसे आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी या भागातील नुकसानीची पाहणी करून शेतकरी ग्रामस्थांचे सांत्वन केले.

नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनास प्रस्ताव सादर करा, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तत्काळ आर्थिक मदत व शिधा पुरवठा करण्याच्या सूचना आमदार बोरसे यांनी यावेळी उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांना दिल्या. (Unseasonal Rain Damage Farmers raised their grievances survey by ministers nashik news)

बागलाण तालुक्यात मंगळवारी (ता.२३) दुपारनंतर जुनी शेमळी, नवी शेमळी, आराई, नागझरी, किरायतवाडी, कॅनॉल चौफुली आदी भागात बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने शेतीपिकांचे १०० टक्के नुकसान झाले.

यात ग्रामस्थांचे घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. वीज महावितरणचे तब्बल ८० ते ९० खांब आणि ट्रान्सफॉर्मर जमीनदोस्त झाले. तर शेळ्या, गायी मृत्यूमुखी पडल्या असून, अनेक ठिकाणी शेतातील झाडेही उन्मळून पडले आहेत. तसेच, चाळीत कांदा भरत असताना उघड्यावर पडलेल्या कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.

जुनी शेमळी येथील प्रशांत बच्छाव यांच्या गोठ्याचे आणि डाळिंब बागेचे, भाऊसाहेब बच्छाव यांच्या घरावरील पत्रे उडून भिंती खचल्या. यावेळी जीवितहानी टळली मात्र मोठे नुकसान झाले आहे. सुरतीराम शेलार यांच्या दीड एकर डाळिंबाचे नुकसान झाले असून रत्नाकर बच्छाव यांची कांदा चाळ उद्ध्वस्त होऊन सर्व कांदे ओले झाले आहेत.

राजेंद्र खैरनार यांची गाय मृत्यूमुखी पडली असून तर गोरख शेलार यांच्या घरावरील पत्रे उडाले. वसंत खैरनार यांची पाचटाची झोपडी उडाल्याने संसार उघड्यावर पडला आहे. नवी शेमळी येथील बाबूलाल गायकवाड यांच्या घरावरील पत्रे दूरवर उडाले.

यावेळी तलाठी श्री. बाविस्कर, दीपक मोटे, कृषी सहायक कापडणीस, ग्रामसेवक चेतन काथेपुरी, तेजस वाघ, संदीप बधान आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Babanrao uncle Sakharchand Bachchav with Dilip Borse while inspecting the damaged house of Bhausaheb Bachchav in Navi Shemli.
Unseasonal Rain News : अवकाळी वादळी वारा, पाऊसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; विजपुरवठा खंडित

पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्या : चव्हाण

माजी आमदार संजय चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी देखील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांचे सांत्वन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या मदतीने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे आवाहन माजी आमदार श्री.चव्हाण यांनी केले आहे.

यावेळी सरपंच कल्पना शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, जनार्दन शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोल बच्छाव, भाऊसाहेब बच्छाव, टी.एन.वाघ, के.सी.वाघ आदी उपस्थित होते.

"दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बागलाणला भेट देऊन आठ दिवसात मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र शासनाकडून अद्यापही शेतकऱ्‍यांना मदत मिळालेली नाही. या सरकारकडून शेतकऱ्‍यांची क्रूर थट्टा सुरू आहे." - संजय चव्हाण, माजी आमदार

Babanrao uncle Sakharchand Bachchav with Dilip Borse while inspecting the damaged house of Bhausaheb Bachchav in Navi Shemli.
Unseasonal Rain : जुनी शेमळी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस; लाखोंचे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.