Unseasonal Rain Damage : द्राक्ष कांद्यापाठोपाठ आता वांग्यानेही मारले; शेतकरी हतबल

 Farmer Sunil Gawli showing that Galian variety of brinjal in field damaged by hail
Farmer Sunil Gawli showing that Galian variety of brinjal in field damaged by hailesakal
Updated on

Unseasonal Rain Damage : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने द्राक्ष कांदा टरबूज पाठोपाठ आता वांग्याला देखील पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

सातत्याने कांद्याला भाव मिळत नसल्याने त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे जीवनगाडा ओढण्यासाठी कांद्याऐवजी गॅलियन वांग्याची (भरीतासाठी स्पेशल) जातीची लागवड केली.

परंतु, मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी व गारपिटीने यापासून मिळणारे तुटपुंजे उत्पन्नही आता मिळेनासे झाले आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (Unseasonal Rain Damage Grapes followed by Onions now hit by Eggplant Farmers desperate nashik news)

अर्धा एकर क्षेत्रात लागवड, मात्र पदरी निराशाच

ब्राह्मणगाव (विंचूर) येथील शेतकरी सुनील गवळी हे आपल्या शेतात पारंपारिक कांदे व भाजीपाला पीक घेतात, परंतु या हंगामात लाल कांद्याला भाव नसल्याने मातीमोल भावाने कांदा विकावा लागला.

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पारंपारिक उन्हाळी कांद्याचे पीक न घेता अर्धा एकर क्षेत्रात भरीतासाठी स्पेशल असलेले गॅलीयन जातीचे वांगे याची लागवड केली. लागवडीनंतर पिकाला पाणी देणे, औषधे, मजुरी असा ६० हजाराचा खर्च केला, पीक चांगले बहरले असताना अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने ती हळूहळू खराब होऊ लागल्याने निराशाच पदरी पडली असल्याची स्थिती आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

 Farmer Sunil Gawli showing that Galian variety of brinjal in field damaged by hail
Market Committee Election : राष्ट्रवादी-शिवसेनेला कपबशी तर सर्वपक्षीय पॅनलला छत्री; उमेदवारांना चिन्हांचे वाटप

कॅरेटला तीस रुपये असा मातीमोल भाव

बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून बारा ते तेरा किलोच्या कॅरेटला ४० ते ५० रुपये भाव मिळत आहे. एका कॅरेटचा खर्च खोडणे व शेतातून बाजारात नेणे यासाठी मातीमोल ३० रुपये भाव मिळत आहे, त्यामुळे केलेला खर्चही निघत नाही.

कोणत्याही शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. वरून अवकाळी व गारपिटीने प्रचंड नुकसान झाले आहे.

"कोणतेही पंचनामे न करता सरसकट एकरी एक लाख रुपयाची मदत करावी. स्थिती इतकी वाईट आहे की बारा ते पंधरा रुपये किलोने व्यापारी व बेदाणा व्यापारी घ्यायला तयार नाही. कोरोनाने दोन वर्ष व आताच्या गारपिटीचे पूर्ण वर्ष यामुळे हा हंगाम वाया गेला आहे. येणाऱ्या पुढील काळात शेतकरी कसा उभा राहील याची मायबाप सरकारने काळजी घ्यावी."

- सुनील गवळी, वांगे उत्पादक शेतकरी, ब्राह्मणगाव (विंचूर).

 Farmer Sunil Gawli showing that Galian variety of brinjal in field damaged by hail
Election : पिंपळगाव बसवंतमध्ये चिन्ह वाटपाच्या वादावर पडदा; बनकर गटाला छत्री तर कदम गटाला बस निशाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.