Unseasonal Rain Damage : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाने द्राक्षांना झोडपले

Grapes
Grapesesakal
Updated on

Unseasonal Rain Crop Damage : त्र्यंबकेश्वर परिसरात काही भागात विज्यांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली असून, या भागामध्ये आज जोराचा पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गाच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.

शेतात उभे असलेले पीक जाण्याच्या मार्गांवर असून, येथील काही परिसरात द्राक्ष बागा विक्रीला असून द्राक्ष बागायदार मोठ्या अडचणीत येणार असल्याचे दिसत आहे. (Unseasonal rain damage grapes in Trimbakeshwar nashik news)

या अवकाळी पावसामुळे द्राक्ष विक्री योग्य राहणार नसून मोठा भुर्दंड सहन करावा लागणार असल्यामुळे शेतकरी पूर्ण गळून गेला आहे. हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे जाणार असून मोठी नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. याधीही असे अस्मानी संकट आले होते.

त्यातही बऱ्याच शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले, मात्र त्यातून काही अंशी वाचलेली पिके आता नेस्तनाबूत करण्याचे काम हा अवकाळी पाऊस करतो आहे. त्यामुळे पुर्ता शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यापुढे यामुळे मोठे संकट उभे ठाकले आहे. द्राक्ष बागासाठी असा पाऊस हानिकारक असून मनी फुटून बाग उध्वस्त होण्याच्या मार्गांवर आहे. यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाला काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Grapes
Dhule Unseasonal Rain : अवकाळी व गारपिटीने कर्ले येथे पिकांचे नुकसान

मुलाप्रमाने जपलेली शेतातील पिके डोळ्यासमोर नष्ट होताना दिसत आहे. यामध्ये प्रमुख द्राक्ष, टमाटे, गहू, वेलवर्गीय पिकांना मोठा फटका बसू शकतो, असे येथील शेतकरी बोलत आहेत. तसेच झालेल्या पिकांचे नुकसानीची चौकशी करून त्वरित पंचनामे करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी होते आहे.

पाच एकर द्राक्षबाग एक्स्पोर्ट दर्ज्याचा तयार केला होता यासाठी खुप कष्ट घेतलेले असतांना मात्र या अवकाळी पावसामुळे पूर्ण पाच एकर बगाला तडे जाऊन मातीमोल विकावा लागणार असून यामधून साधे बागासाठी लागलेले भांडवल देखील निघणार नसल्याचे दिसत आहे.

"आमच्यापुढे मोठे संकट उभे असून बागा तोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीय,एव्हडे भांडवल उभे करून जर असे दिवस बागा मुळे बघावंयास मिळनार असेल तर ते नाही केलेलेच बरे,लागणारे औषधे मजुरी परवडत नसून त्यात आशी नुकसान झाल्यामुळे काय कराव असा मोठा प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला आहे." - संजय चव्हाण, अंजेनेरी पोलीस पाटील

Grapes
Unseasonal Rain Damage : इगतपुरीच्या पूर्व भागात शेकडो हेक्टर बाधित; गारपिटीने शेतकरी उध्वस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.