Unseasonal Rain : कळवण तालुक्यात पंधराशे हेक्टरवर नुकसान; शेतकरी चिंताग्रस्त

Officials along with MLA Nitin Pawar inspecting the damage caused by unseasonal rain
Officials along with MLA Nitin Pawar inspecting the damage caused by unseasonal rainesakal
Updated on

Unseasonal Rain : कळवण तालुक्यात १५ व १६ एप्रिलला झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यातील जवळपास पंधराशे हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून सर्वाधिक नुकसान बाराशे हेक्टर कांदा पिकाचे झाले आहे.

मार्च व एप्रिल महिन्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी केली आहे. (Unseasonal Rain Damage on fifteen hundred hectares in Kalwan taluka Farmers worried nashik news)

आमदार नितीन पवार यांनी कळवण व नवीबेज शिवारासह ओतूर खोऱ्यातील ओतूर, कुंडाणे, वडाळे वणी, मेहदर, मुळाणे, नरुळ, कन्हेरवाडी, शिरसमणी, भुसणी भागात ढगफुटीसारखा पाऊस पडल्यामुळे सोमवारी (ता. १७)शेतकऱ्यांच्या शेतात व बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

नुकसानीची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. मोकभणगी, धनेर दरेभणगी परिसरातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा पाहणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आमदार पवार यांच्यासह तहसीलदार कैलास पवार, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, तालुका कृषी अधिकारी मीनल म्हस्के, शासकीय अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.

भरपाई मिळाली नसल्याची तक्रार

तालुक्यात गेल्या मार्च महिन्यात १ ते १० मार्च व १७ मार्चला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यात १२०० हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. त्याची अद्याप भरपाई मिळाली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप शिंदे, प्रकाश बंगाळ, उमेश वाघ, बबलू शिरसाठ, हिरामण वाघ, अतुल देवरे, अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Officials along with MLA Nitin Pawar inspecting the damage caused by unseasonal rain
Onion Crisis : कांदा आभाळातून पडलेला नाही! अनुदानासाठी सातबारावर नोंदीच्या अटींवर शेतकऱ्यांचा संताप

सरसकट पंचनाम्याची मागणी

ओतूरच्या चौरंगनाथ खोऱ्यात ढगफुटीसारखा पाऊस, गारपीट, वादळी वारे व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, कांदा, मिरची, टोमॅटो, द्राक्ष, बाजरी, आंबा यांचे मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळे तत्काळ सरसकट वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत.

शेतकऱ्यांना दिलासा द्यावा : नितीन पवार

कोणीही आपत्तीग्रस्त शेतकरी नुकसानीच्या पंचनाम्यापासून व शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याकरिता नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन महसूल व कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून शासनाला अहवाल सादर करावा.

शासनाने तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देऊन तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी केली आहे.

Officials along with MLA Nitin Pawar inspecting the damage caused by unseasonal rain
Sinnar Market Committee Election : वाजे-सांगळे गटाकडून प्रचाराची आघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.