Nashik Unseasonal Rain Damage: अवकाळीने बिघडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित; ढगाळ वातावरणाने धास्तावला बळीराजा

A farming family struggling to save the remaining paddy crop
A farming family struggling to save the remaining paddy cropesakal
Updated on

इगतपुरी : तालुक्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या हातीतोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षभराचे अर्थिक नियोजन बिघडले आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकाचे नियोजन खरिपातील पिकांच्या येणाऱ्या उत्पादनावर अवलंबून असते.

रब्बी हंगामात गहू, हरभरा, मसूर व काही प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड होते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने उन्हाळी कांद्याचे पीक फार महत्त्वाचे असते.

या कांद्याची विक्री करून येणाऱ्या पैशातून त्याचे पुढील हंगामाचे व वर्षाचे आर्थिक नियोजन असते. (Unseasonal Rain Damages Farmers Financial Math farmer scared by cloudy weather Nashik)

या वर्षी खरिपात पेरणी उशीरा झाली, पिके चांगली आली होती. सध्या कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकरी खुश होता. शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नियोजन खरिपमधील भात शेतीवर असते.

भात सोंगणी करून भात बाजारात विक्री करून त्याच्यातून येणाऱ्या पैशातून पुढील हंगामाची तयारी असते.

दरम्यान, तालुक्यात काद्याांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात नसले, तरी काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे बियाणे टाकली होती. मात्र, अवकाळीचा जोरदार तडाखा बसल्यामुळे ती दाबली गेल्याने मोठी चिंता वाढली आहे.

दरम्यान, दिवाळीनंतर खरिपातील पिकांची काही शेतकऱ्यांनी कापणी केली होती. काही शेतकरी कापणीच्या तयारीत होते.

अचानक अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतात कापणी केलेल्या पिकांंना अंकुर फुटले आहेत आणि जास्त दिवस शेतातच पडून राहिल्याने दाणे काळे पडले. उभे असलेल्या पिकांत पाणी साचल्याने सडली आहेत.

A farming family struggling to save the remaining paddy crop
Unseasonal Rain Damage: अवकाळीग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजचा प्रस्ताव : मंत्री अनिल पाटील

भातावर करपा रोगाचा प्रादूर्भाव

तालुक्यात बहुतांश ठिकाणी मंगळवारी (ता. २८) ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. काही भागातील भात पिकातून अद्याप पाणी ओसरलेले नाही.

सर्वत्र भात पिके सोंगणीवर आली असतानाल काही ठिकाणी पिकांवर करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित झाला आहे.

शेतकऱ्यांनी शेतात सोंगलन ठेवलेला भात भिजला आहे. भात पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. भात वेळेत खाचरातून उचलले नाही, तर त्याला मोड येऊन शंभर टक्के नुकसान होते. त्यामुळे नुकसानीच्या भितीने बळीराजा धास्तावला आहे.

A farming family struggling to save the remaining paddy crop
Jalgaon Unseasonal Rain Damage : जिल्ह्यात अवकाळीने 905 हेक्टरच नुकसान; हरभऱ्यासह कांद्याचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.