Unseasonal Rain Nashik : वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात पाणीपुरवठा विस्कळित

Water supply
Water supplyesakal
Updated on

Unseasonal Rain Nashik : रविवारी (ता. ९) सायंकाळपासून सुरू झालेल्या वादळी पावसामुळे ठिकठिकाणी वृक्ष म्हणून पडले, तर अनेक ठिकाणी वीज जनित्र बंद पडल्याने नाशिक रोड व गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाला. (unseasonal rain Due to power cut water supply in city is disrupted nashik news)

परिणामी सोमवारी (ता. १०) दुपारपर्यंत या भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी सायंकाळी शहरात मुसळधार पाऊस झाला. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर नाले चोकअप झाले.

वादळी पावसामुळे विद्युत जनित्र अनेक ठिकाणी बंद पडले. परिणामी वीजपुरवठा खंडित झाला. नाशिक रोड, उपनगर, द्वारका भागात रविवारी रात्रीपर्यंत वीजपुरवठा बंद होता. हीच परिस्थिती सकाळपर्यंत होती.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Water supply
Dr. Bharati Pawar : जलयुक्त शिवारसाठी 231 गावांची निवड; डॉ. पवार

गांधीनगर व नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रावर रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने टाक्या भरल्या गेल्या नाही. परिणामी द्वारका भागापासून पुढे नाशिक रोडपर्यंत पाणी नसल्याने जनजीवन विस्कळित झाले.

Water supply
Nashik ZP News : देयके देण्यासाठी अखेरचे 3 दिवस; जिल्हा परिषदेत मार्च एंडची गुरुवार डेडलाइन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.