Unseasonal Rain : जिल्ह्यात अवकाळीचा 3 दिवसांत ४ हजारांहून अधिक हेक्टरला दणका
नाशिक : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बदललेल्या हवामानासोबत मेघगर्जना आणि वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने गेल्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यातील चार हजार १५५ हेक्टर क्षेत्राला फटका दिला आहे. (unseasonal rain Over 4 thousand hectares of bad weather in 3 days in district nashik news)
त्यामध्ये गव्हाचे सर्वाधिक दोन हजार ४२० हेक्टर, तर द्राक्षांचे ९७९ हेक्टरचा समावेश आहे.
द्राक्षपंढरी निफाड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे दोन हजार ४०५, त्याखालोखाल येवला तालुक्यात ४८३, सिन्नर- ३२२, चांदवड- ११०, इगतपुरी- ८६, कळवण- १२, सुरगाणा- ८, त्र्यंबकेश्वर- २.२०, बागलाण- २, तर देवळा तालुक्यात ०.४९ हेक्टरचे नुकसान झाले.
कृषी विभागाचा हा प्राथमिक अहवाल आहे. प्रत्यक्ष पंचनाम्यात त्याहून अधिक क्षेत्रातील नुकसान पुढे येण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, आज सूर्यनारायणाचे दर्शन झाले. मात्र, दुपारनंतर पुन्हा हवामान बदलले आणि काळ्याकुट्ट ढगांनी अवकाश व्यापून अवकाळी पावसाने काही वेळ हजेरी लावली.
वादळी वाऱ्यामुळे गहू, मका झोपला. तसेच, काही भागात द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. द्राक्षांच्या मण्यांना तडे गेले आहेत. शेतातील कांदा भिजला आहे. भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे. आंब्याचा मोहोर गळाला आहे.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार पीकनिहाय नुकसान झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये असे : कांदा- ३१४.५० (नाशिक- ७६.५०, सिन्नर- ४१, चांदवड- ६०, येवला- १३७), कांदा रोपे- चांदवड तालुका १२, मका- ८४.५९ (देवळा- ०.४९, सिन्नर- २८, येवला- ४८.१०), ज्वारी- सिन्नर तालुका १२, गहू- दोन हजार ४१९.२० (कळवण-१.२०, नाशिक- १६३.३०, इगतपुरी- ३६, निफाड- एक हजार ७४५, सिन्नर- २२८, चांदवड- १३, येवला- २३२.७०),
टोमॅटो- कळवणमधील ३.५०, बाजरी- त्र्यंबकेश्वरमधील ०.१०, हरभरा- ९४ (नाशिक- ४०, इगतपुरी- १६, सिन्नर- ५, चांदवड- १५, येवला- १८), भाजीपाला- २०१.१५ (बागलाण- २, कळवण- ७.२५, नाशिक- १५४.८०, इगतपुरी- २६, चांदवड- १०), द्राक्षे- ९७८.८० (नाशिक- २६७.१०, निफाड- ६६०, येवला- ४५.७०), आंबा- ३३.८० (सुरगाणा- ८, नाशिक- २२.८०, त्र्यंबकेश्वर- २, सिन्नर- १), डाळिंब-येवला १.२०.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.