Upanayan Sanskar : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था व भद्रकाली देवी न्यास आयोजित विनामूल्य सार्वजनिक उपनयन संस्कार सोहळा सोमवारी (ता.१) नाशिक ग्रामदैवत भद्रकाली मंदिर येथे मोठया थाटात झाला.
विधीस सकाळी ६ वाजता सुरवात होऊन मातृभोजन व बटूंची मिरवणुक काढण्यात आली. एकावेळी २१ बटूंची तीन बग्गीतील मिरवणुक आकर्षण ठरले. उपस्थित कुटुंबीयांनी नृत्य करत आनंद व्यक्त केला. (Upanayan Sanskar of batu in Excitement family overwhelmed by royal ceremony nashik news)
याज्ञिकरत्न वेदमूर्ती राजाभाऊ खोचे, वेदमूर्ती गिरीश पैठणे, घनपाठी धनंजय जोशी, गुरुजी अमेय काथे यांच्या वेदशास्त्र ब्रह्मवृंदांच्या अध्यक्षतेखाली सोहळा मंत्राच्या जयघोषात उपनयन संस्कार सोहळा झाला.
सकाळी सव्वादहा वाजता सर्व बटूंची मुंज लावण्यात आली. संस्कारातून सत्पुरुष व यशस्वी पुरुष घडण्यासाठी उभयतांनी सर्व बटूस फुलांचा वर्षाव करत आशीर्वाद दिला. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फे बटूंचा भद्रकाली देवी प्रतीक सन्मानचिन्ह व पगडी देऊन सत्कार झाला.
व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष अविनाश भिडे, केंद्रप्रमुख महेश शुक्ल, सुभाष सबनिस, राजेश उपासनी, समीर जोशी, अनिल देशपांडे, उद्योजक दत्तात्रेय देशमुख, जिल्हाध्यक्ष मनसे अंकुश पवार, अध्यक्ष गायरान ट्रस्ट एकनाथ कुलकर्णी, भद्रकाली न्यास अध्यक्ष उदयन दीक्षित,
मुंज समितीप्रमुख अनिल नांदुर्डीकर, कोषाध्यक्ष सतीश करंजीकर, महिला कार्यवाहिनी अश्विनी पेशकार, वसुधा जोशी, गौरी पर्वते, गौरी व अमेय वैद्य, अमोल लाळे, प्रसन्न पंडित, पौरोहित्य अमेय काथे उपस्थित होते. सोहळ्यात राज्यभरातून तसेच स्थानिक कुटुंबीय सहभागी झाले होते. नाशिक केंद्र अध्यक्ष महेश शुक्ल यांनी आभार मानले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
"करण जोशी या माझ्या भाच्याची मुंज लावताना तसेच एकंदरीत मुंजीचा शाही थाट अनुभवत मोठे समाधान वाटले. आम्हाला शुक्ल सरांच्या रूपात साक्षात देव माणूस भेटला."
- नितीन कोराने, बटूंचे मामा, त्र्यंबकेश्वर
"मुलाच्या मुंजीच्या सोहळ्याचा थाट बघून भारावून गेले. मिरवणुक, फुलांचा वर्षाव या साऱ्याने भावना पुन्हा एखादा अनावर झाल्या. आजी- आजोबांनाही हा सोहळा खूप आवडला."
- सोनाली जोशी, बटूची आई, अकोला
"सामुदायिक मुंज सोहळा पण अपेक्षाच्या पलीकडे असा हा सोहळा असा झाला. अगदी घरी जसा आपण सोहळा करतो, त्याहीपेक्षा जास्त थाटात हा सोहळा पार पडला."
- सारीका दंडे, बटूची आई
"मुंजीचा सोहळा हा डोळ्याचे पारणे फेडणारा झाला. बटूंची घोड्याच्या रथातील शाही मिरवणुक, संस्कार विधी, मातृभोजन, भोजन ही सारी व्यवस्था उत्तम होती."
- योगिता कुलकर्णी, बटूंची आत्या, अहमदनगर
"आमचे दोन बटू सोहळ्यात सहभागी झाले होते. अतिशय उत्कृष्टरीत्या सोहळा झाला. भद्रकाली देवी मंदिर व सोहळ्यातील संस्कार धिधीला असलेले प्राधान्य, याने भारावून गेलो."
- योगेश नाकील, बटूंचे वडील, अहमदनगर
"‘जन्मजात् जायते ज्ञेय: संस्कारात द्वीज उच्चते’ याप्रमाणे संस्कार घडून उत्तम प्रकारचा माणूस घडावा यासाठी सर्वात महत्त्वाचा उपनयन संस्कार सोहळा आहे. समाजातील सर्व स्तरातील घटकांना एकत्रित करून हा सोहळा देवीच्या चिबुकस्थानी म्हणजेच भद्रकाली मंदिरात उत्तमप्रकारे संपन्न झाला." - अमेय काथे, गुरुज
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.