Teachers Day 2023: शिक्षक दिनापासुनच शासकिय एकलव्य मॉडेल स्कूलच्या शिक्षकांचे आमरण उपोषण प्रारंभ

दोन वर्षापासुन प्रलंबित परिविक्षाधिन कालावधी विलोपीत करण्याची मागणी
Eklavya Model School uposhan
Eklavya Model School uposhanesakal
Updated on

Teachers Day 2023 : आजमेर सौंदाणे ता. बागलाण येथील आदिवासी विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्रात चालणाऱ्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कुल मधे सन २०१८ व २०१९ मधे सरळ सेवा भरतीने नियुक्त कर्मचाऱ्यांचा परीविक्षाधिन (प्रोबेशन) कालावधी उलटुन दोन वर्ष झाली,

तरी विलोपित न केल्याने आज दि. ५ सप्टे २०२३ शिक्षक दिनापासुन सर्व कर्मचारी शाळेतच बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. (fast to death of teachers of Government Eklavya Model School will start from Teachers Day 2023 Nashik)

याबाबत अधिक माहिती अशी की, सरळ सेवा भरतीने सन २०१८ व २०१९ मधे नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिलेल्या नियुक्ति आदेशानुसार प्रोबोशन काळ तीन वर्ष होता. तो कालावधी अनुक्रमे २०२१ व २०२२ मधे विलोपीत होणे अपेक्षीत होते.

परंतु परिविक्षाधिन कालावधी उलटुन दोन वर्ष होत आले मुल्यमापन अहवालही आयुक्त कार्यालयास सादर झालेले आहेत.

तरीही परिविक्षाधिन कालावधी विलोपित केलेला नाही.तो विलोपित करावा व सातवा वेतन आयोग लावुन फरकाची रक्कम अदा करावी म्हणुन शासन दरबारी त्यांनी वारंवार अर्ज विनंत्या केल्या.

आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, आदिवासी मंञी, आयुक्त, नेस्टचे नवी दिल्ली येथिल आयुक्त यांनाही वारंवार विनंती केली. परंतु या मागणीला फारसे गांभिर्याने घेतले नाही, म्हणुन महाराष्ट्रातील सदतीस एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कुल मधील एकुण नव्वद कर्मचारी शिक्षकदिनी प्राणांतिक आमरण उपोषण आरंभ केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Eklavya Model School uposhan
Jr College Teacher Protest : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे शिक्षकदिनी काळ्या फीत आंदोलन

त्यांची प्रमुख मागणी परिविक्षाधिन कालावधी विलोपित करुन सातवा वेतन आयोग लागु करावा व विलोपित कालावधीपासुनचा फरक अदा करावा यासाठी आमरण उपोषण राज्यातील त्या त्या शाळांमधे कर्तव्यावर हजर राहुन करत आहेत.

यामधे तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथिल एकलव्य शाळेत कार्यरत कर्मचारीही सहभागी होणार आहेत. सदरील निवेदनावर गणेश गायसमुद्रे, एस. आय. जगताप, अख्तरखान पठाण, सुरेश पवार, श्रीमती घाडगे, श्रीमती ताठे, श्रीमती जाधव आदि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या सह्या आहेत.

Eklavya Model School uposhan
Jr College Teacher Protest : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे शिक्षकदिनी काळ्या फीत आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()