OTP Fraud : ओटीपी चोरून फ्रॉड रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची हेल्पलाइन; हा आहे क्रमांक...

Helpline of Union Home Ministry
Helpline of Union Home Ministryesakal
Updated on

नाशिक : सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

ऑनलाइन (Online) व्यवहार करताना अनेक प्रकाराच्या सुरक्षितता असतानाही सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक केली जाते. (Use 155260 to prevent fraud by stealing OTP Helpline of Union Home Ministry to prevent cyber crime nashik news)

विशेषतः ओटीपीचा वापर करून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अशाप्रकारे फसवणूक झाल्यास संबंधितांनी राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलची हेल्पलाइन १५५२६० या क्रमांकावर संपर्क साधल्यास गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक आहे. ही हेल्पलाइन केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली आहे.

ऑनलाइन व्यवहारातून सायबर गुन्हेगार विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांना गंडा घालत आहेत. यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानेच ऑनलाइन फसवणुकीची तक्रार तत्काळ नोंदविण्यासाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक १५५२६० हा राष्ट्रीय पातळीवर सुरू केला आहे.

विशेषतः ऑनलाइन आर्थिक व्यवहारावेळी ओटीपी क्रमांकाचा वापर करून आर्थिक फसवणूक झाल्यास त्यासाठी सदरील हेल्पलाइनचा वापर २४ तासांच्या आत केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Helpline of Union Home Ministry
Holi Festival : होळी सणासाठी हारकडे बनविण्यासाठी लगबग!

तत्काळ संपर्क साधावा

पीडित इंटरनेट बँकिंगसह ऑनलाइन फायनान्सशी संबंधित फसवणुकीची तक्रार या १५५२६० या क्रमांकावर नोंदवू शकतात किंवा ऑनलाइन फसवणुकीनंतर पोलिस अधिकाऱ्याद्वारे १५५२६० या हेल्पलाइनवर कॉल करावा. फसवणूक झाल्यापासून २४ तासांपेक्षा जास्त वेळ झाला असेल, तर पीडितेने नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर औपचारिक तक्रार नोंदवावी.

फसवणूक झाल्यापासून २४ तासांपेक्षा कमी कालावधी झाला असल्यास, पोलिस ऑपरेटर फॉर्म भरण्यासाठी गुन्ह्याचा तपशील आणि पीडित व्यक्तीची वैयक्तिक माहिती घेतली जाते. हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करताच त्याची माहिती संबंधित वित्तीय संस्थांपर्यंत पोचवली जाते. व्यवहाराची माहिती तपासल्यानंतर व्यवहार तात्पुरता ब्लॉक केला जातो.

...अशी आहे प्रक्रिया

सायबर फसवणूक झाल्यानंतर हेल्पलाइन क्रमांक १५५२६० वर कॉल करावा. सदरचा कॉल संबंधित राज्याच्या पोलिसांद्वारे चालविला जातो. कॉलला उत्तर देणारा पोलिस ऑपरेटर त्या व्यवहाराचे तपशील आणि पीडित व्यक्तीची मूलभूत वैयक्तिक माहिती घेतो. ती माहिती नागरिकांच्या आर्थिक सायबर फ्रॉड रिपोर्टिंग आणि व्यवस्थापन प्रणालीला दिली जाते.

Helpline of Union Home Ministry
MBA CET Exam : एमबीए सीईटीच्या नोंदणीसाठी 4 मार्चपर्यंत मुदत

त्यानंतर पीडितेला त्याच्या तक्रारीचा पोचपावती क्रमांक असलेला एसएमएस मिळतो. फसवणुकीचा संपूर्ण तपशील नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (https://cybercrime.gov.in) २४ तासांच्या आत कळविण्याच्या सूचना दिल्या जातात.

"ऑनलाइन फसवणूक होऊ नये आणि झालीच तर त्यासाठी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे. तसेच अनेक हेल्पलाइन क्रमांकही जाहीर केलेले आहेत. पोलिसांकडून जनजागृतीही केली जाते. परंतु नागरिक दक्षता घेत नाहीत. १५५२६० वा १९३० यावर तत्काळ संपर्क साधला गेला तर गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते वा तो व्यवहार ब्लॉकही करता येतो." -अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक

Helpline of Union Home Ministry
NMC News : धोकादायक वाडा पडल्यास आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.