Nashik: शौचालय तयार करण्यासाठी सिमेंटच्या टाकीचा वापर; कमी खर्चात तयार होत असल्याने खरेदीकडे नागरिकांचा कल

Three tanks placed for toilets in Saiyid Park area of ​​Daregaon In the second photo, Sadruddin preparing the iron frame for the toilet tank.
Three tanks placed for toilets in Saiyid Park area of ​​Daregaon In the second photo, Sadruddin preparing the iron frame for the toilet tank.esakal
Updated on

Nashik News : शहरात वेगवेगळ्या व्यवसायामध्ये येथील कारागिरांनी कसमादे नव्हते तर जवळपासच्या अनेक जिल्ह्यात मालेगावचे नाव प्रसिद्ध केले आहे. जुन्या वस्तूला जुगाड करण्यासाठी येथील नागरिक प्रसिद्ध आहे.

आता यात आणखी एका जुगाडाची भर पडली आहे. येथे सिमेंटच्या पाण्याच्या टाकीला नागरिकांनी शौचालयाच्या टाकीसाठी जुगाड केला आहे. कमी खर्चात शौचालय तयार होत असल्याने नागरिकांच्या कल दिवसेंदिवस सिमेंटच्या टाकीकडे वाढत आहे. (Use of cement tank to construct toilet Citizens tend to buy as it is produced at low cost Nashik)

शहरात सुरवातीला सिमेंटच्या टाक्या यंत्रमाग, जनरेटर, पिठाची गिरणी याठिकाणी या टाक्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. कालांतराने मालेगावला प्रत्येक घरात सिमेंट टाक्यांचा पाणी भरण्यासाठी वापर होऊ लागला.

त्यानंतर आता त्याची जागा प्लास्टिकच्या टाक्यांनी घेतली. त्यामुळे काही काळ शहरातून सिमेंट टाक्या तयार केल्या जात नव्हत्या. यावर येथील सिमेंट टाकी बनविणाऱ्या व्यावसायिकांनी शक्कल लढवली. त्यांनी तीन टाक्यांचा वापर करत त्याची योग्य मांडणी आणि जोडणी करत शौचालय तयार करण्यास सुरवात केली आहे.

शहरात पत्र्याची, इंगळ, फरशीची घरे मोठ्या प्रमाणात आहे. ही घरे कमी वेळेत व अल्प खर्चात तयार केले जाते. गरीब नागरिकांना शौचालय तयार करण्यासाठी सेफ्टी टाकीला तीस ते पन्नास हजार रुपये खर्च येत असल्याने तो खर्च येथील नागरिकांच्या आवाक्याबाहेर होता.

त्यामुळे शौचालयासाठी सिमेंटच्या तीन टाक्यांचा जुगाड येथील कारागिरांनी केला. या जुगाडमुळे पत्र्यांच्या घरे बांधणाऱ्या नागरिकाला अवघ्या १० ते १५ हजार रुपयांमध्ये शौचालय बनवूत मिळू लागले आहे. त्यामुळे मालेगावला सध्या या टाक्याच्या मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Three tanks placed for toilets in Saiyid Park area of ​​Daregaon In the second photo, Sadruddin preparing the iron frame for the toilet tank.
Drugfree India: आजपासून ‘नशामुक्त भारत पंधरवडा! अंमलीपदार्थांच्या धोक्याविरुद्ध जनजागृतीसाठी केंद्राचा पुढाकार

शहरात वीस ठिकाणी शौचालयाचा टाक्या बनवून दिल्या जातात. येथील जुगाडू शौचालय चाळीस ते पन्नास वर्षे टिकतात. टाक्या बनविताना तीनशे ते एक हजार लिटर टाक्यांचा वापर केला जातो.

टाकी बनविण्यासाठी सिमेंट, खडी, रेती, जुना ऑइल व लोखंड साहित्य वापरले जाते. येथे तयार होणाऱ्या टाक्यांची उंची साडे तीन ते पाच फुटापर्यत असते. शौचालयाच्या टाक्या तयार करताना साडेतीन फुटाच्या टाकीचा वापर होत असल्याचे शहाबुद्दीन टाकी सेंटरचे संचालक जहिरुद्दीन यांनी सांगितले.

"शहरात दुसऱ्या पिढीपासून टाकी बनविण्याच्या व्यवसाय आहे. हद्दवाढ झालेल्या भागात नवीन पत्र्याची घरे तयार होत आहे. या घरात सिमेंटच्या टाक्याचे शौचालय कमी खर्चात तयार करून देतो." - शहाबुद्दीन , टाकी विक्रेता, रमजानपुरा, मालेगाव

Three tanks placed for toilets in Saiyid Park area of ​​Daregaon In the second photo, Sadruddin preparing the iron frame for the toilet tank.
Aashadhi Wari 2023: दिंडीत वारकऱ्यांच्या आरोग्याचीही होतेय जपवणूक! अतिगंभीर आजारासाठी 108 रुग्णवाहिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.