Nashik News : ई-पॉस यंत्राचा वापर अत्यावश्यक; येवल्यात कृषी अधिकाऱ्यांची पाहणी

Abhijit Jamhadhe, campaign officer of agriculture department, taluka agriculture officer R. G. Bodke etc.
Abhijit Jamhadhe, campaign officer of agriculture department, taluka agriculture officer R. G. Bodke etc.esakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : खत विक्री करताना ई-पॉस मशिनचा वापर करणे अत्यावश्यक असताना देखील अनेक विक्रेत्यांकडे मालाचा साठा, उपलब्ध साठा, ई-पॉस मशिनचा साठा यामध्ये तफावत आढळून आली आहे.

ई-पॉस मधील साठा तत्काळ कमी केल्यास चालू हंगामात खताचा साठा मुबलक प्रमाणात पुरवठा होईल. त्यामुळे सर्व खत विक्रेत्यांनी ई-पॉस व गोदामात साठा सारखा राहण्याची दक्षता घ्यावी अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांनी येथील विक्रेत्यांना दिल्या. (Use of ePOS machine mandatory Inspection of agriculture officials in Yeola Nashik News)

जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी अभिजित जमधडे, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी आर. जी. बोडके यांनी कृषी सेवा केंद्राला भेट देऊन अंदरसुल व येवला येथील खत विक्रेत्यांच्या दुकानाची तपासणी केली.

या वेळी खत विक्रेत्यांकडे ई-पॉसवर दिसणारा व प्रत्यक्षात उपलब्ध असलेला खत साठा यामध्ये तफावत आढळून आली. हा साठा एकच ठेवण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. अंदरसुल व येवला येथे भेटीदरम्यान आर. सी. एफ. कंपनीचे पणन अधिकारी श्री. कापसे व माफदाचे नितीन काबरा आदी उपस्थित होते.

पिकावर फवारणी करताना यापूर्वी त्या पंपाने कोणती कीटकनाशक फवारणी केले का याची नीट खात्री करून टाकी स्वच्छ धुवून दुबार फवारणीसाठी वापरात आणावी. तसेच, तनणाशकासाठी स्वतंत्र फवारणी पंप वापरावे असे आवाहनही श्रीमती बोडके व जमधडे यांनी केले आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Abhijit Jamhadhe, campaign officer of agriculture department, taluka agriculture officer R. G. Bodke etc.
Saptashrungi Devi : आदिमायेच्या दर्शनाने भाविक तृप्त; सप्तशृंगगडावर भाविकांचा महापूर

खते अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करा

शेतकरी बांधवांनी निविष्ठा खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावे. बियाणे, खते कीटकनाशके खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. बिल पिकाच्या काढणीपर्यंत सांभाळून ठेवावे. काही कंपन्या दुय्यम दर्जाची (डुप्लिकेट खते) शेतकऱ्यांच्या बांधावर स्कीम स्वरूपात विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा.

अशी दुय्यम दर्जाची खते कोणत्याही भूलथापास बळी न पडता अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावे. बियाणे कीटकनाशके खरेदी करताना बिलावर बॅच नंबर, एक्स्पायरी डेट लिहिलेली असल्याची खात्री करावी.

तसेच बॉटल किंवा वेष्ठणावरील माहिती पूर्णपणे वाचून सदरचे कीटकनाशक त्याच पिकासाठी आहे का याची खात्री करून फवारणी करावी असे आवाहन मोहीम अधिकारी अभिजित जमधडे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती बोडखे यांनी केले.

Abhijit Jamhadhe, campaign officer of agriculture department, taluka agriculture officer R. G. Bodke etc.
Nashik News : पालखेड पाटबंधारे विभागाकडून 105 टक्के पाणीपट्टी वसुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.