Nashik Rice Sowing: भात लागवडीसाठी जपानी पद्धतीचा वापर! इगतपुरी तालुक्यातील काही भागांत पावसाची उसंत

Nashik Rice Sowing
Nashik Rice Sowingesakal
Updated on

Nashik Rice Sowing : तालुक्यात वरुणराजाने मागील पंधरवड्यात सलग दहा दिवस चौफेर हजेरी लावून बळीराजाची समाधानी व शेतामध्ये पावसाची आबादानी केली. मात्र, पूर्व भागात पाऊस कमी झाला आहे.

गेल्या दोन दिवसापासून पावसाने काही भागात थोडीशी उसंत घेतली आहे. काही भागात अधूनमधून पाऊस होत आहे. दारणाकाठच्या गावांत मुख्य पीक असलेल्या भात आवणीला उशिराने का होईना जोमाने सुरवात झाली आहे.

मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांनी जपानी पद्धतीचा वापर सुरू केला आहे. (Use of Japanese Method for Rice Cultivation Rainfall in some parts of Igatpuri taluka nashik)

उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यावर टाकलेली भाताची रोपे लावणीला आली असताना, जुलैच्या मध्यावर पावसाने सुरवात केल्याने काळजीत पडलेला बळीराजा मागील १५ दिवसांच्या पावसाने सुखावला आहे.

त्यामुळे वेळेत कामे उरकण्यात येत असून, ट्रॅक्टरद्वारे मशागत करून शेत तयार केले जात आहे. मात्र, लागवडीसाठी मजुरांवरच अवलंंबून राहावे लागत आहे. दारणाकाठच्या गावांमध्ये इंद्रायणी व १००८ या जातीच्या भाताची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Rice Sowing
Nashik Bribe Cases: ACBकडून राज्यभरात अवघे 6 गुन्हे दाखल; नाशिकमध्ये एकही नाही! ‘अपसंपदे’ची कारवाई नगण्य

त्यासाठी शेतकरी शेतात रोपे तयार करतात. रोपांच्या चांगल्या वाढीसाठी रासायनिक खते टाकली जातात.

"सध्याच्या परिस्थितीत भात लागवडीसाठी एकरी ८ ते १० हजारांचा खर्च येतो. जपानी पद्धतीने दोरी लावून लागवड केली जाते. खतगोळी पद्धतीने बुडालगत टाकली जाते. त्यामुळे खत वाहून न जाता उत्पादन वाढीस मदत होते. एकरी ३० ते ३५ पोते उत्पादन अपेक्षित असून, चार महिन्यांत पीक तयार होते." -संतोष भोईर, शेतकरी, वंजारवाडी

Nashik Rice Sowing
NMC Property Survey: शहरात 37 हजार मिळकती घरपट्टीविना! शोधासाठी खासगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.