नाशिक : पर्यावरण संवर्धनासाठी घराबाहेर पडलेला उत्तर प्रदेशच्या प्रदीप कुमार या युवकाने संपूर्ण भारतभर सायकलवरून भ्रमंती करीत तब्बल एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत त्याने झारखंड, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांसह अकरा राज्यांची भ्रमंती करून सुमारे 13 हजार झाडे लावले आहेत.
दरम्यान, प्रदीप कुमार नाशिकमध्ये आला असता पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या निदर्शनास तो आला. बारकुंड यांनी त्यास आपल्या निवासस्थानी नेऊन विचारपूस करून त्याला प्रोत्साहन दिले. (Uttar Pradesh cyclist Pradeep Kumar planted 13000 trees during his tour across India Nashik Latest Marathi News)
प्रदीपचे वडील झाडे कापण्याचे काम करत. गंभीरस्वरुपाच्या आजारातून प्रदीप पूर्णपणे बरा झाल्यानंतर आपण काहीतरी मोठे काम करावे, असे नेहमीच त्याला वाटत राहायचे. अशाप्रकारे एक मोठे स्वप्न घेऊन तो कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडला आणि संपूर्ण देशात सायकलवरून भ्रमंतीदरम्यान एक लाख झाडे लावण्याचा त्याने निर्धार केला. अशा प्रकारे तो पूर्ण देशात झाडे लावण्याचा संदेश देत सायकलवरून भ्रमंती करतो आहे.
हृदयविकार व पोटाच्या आजारातून बरे झालेला असतानादेखील घरातून अवघे चाळीस रुपये खिशात घेऊन प्रदीप कुमारने घर सोडले. बुधवारी (ता.७) सकाळी तू नाशिकमध्ये होता. तर, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड हेही दररोज सकाळी सायकलिंग करतात.
त्यावेळी त्यांना प्रदीप कुमार नजरेस पडला. सायकलवरील ‘संपूर्ण भारत भ्रमंती’चा फलक पाहून त्यांनी आस्थेने चौकशी केली आणि त्यास आपल्या निवासस्थानी घेऊन आले. त्यास आर्थिक मदतही केली. तसेच त्यास पुढील भ्रमंतीकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी त्याच्या साध्या सायकलीला सेकंड हॅन्ड गिअर्स बसून देऊ का, असा प्रश्न विचारल्यावर त्याने, ज्याप्रकारे सर्वसामान्य लोक सायकल चालवतात त्याच प्रकारे मीसुद्धा साधारण सायकलीवरूनच संपूर्ण देशात भ्रमंती करणार असल्याचे सांगितले. यामुळे उपायुक्त बारकुंड यांनी त्याचे विशेष कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.