Nashik News : बिगर पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या जागा भराव्यात; पाठपुरावा करण्याचे झिरवाळ यांचे आश्वासन

PESA Teacher Recruitment Schedule Announced nashik news
PESA Teacher Recruitment Schedule Announced nashik newsesakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील आदिवासी तालुका (पेसा) क्षेत्रातील शिक्षक पद भरतीच्या अनुषगांने पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीचे काम शिक्षण विभागांकडून सुरू असताना दुसरीकडे या भरतीबाबत उमेदवारांकडून दररोज नवीन प्रश्न उपस्थित होत आहे. आज उमेदवारांनी पुन्हा जिल्हा परिषदेत धाव घेतली.

पेसा व बिगर पेसा अंतर्गत ९०९ रिक्त जागांची संख्या असून त्या तुलनेत ३११ जागा भरण्यात येत आहे. त्यासाठी या जागा वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. (Vacancies of non professional teachers should be filled Jhirwal promise to follow up nashik news)

याबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेतली. यात जागा वाढविण्याबाबत शिक्षण आयुक्त यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन झिरवाळ यांनी यावेळी दिले.

सोमवारी (ता.१८) जिल्हा परिषदेत झिरवाळ यांनी पेसातील उमेदवारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. यात उमेदवारांनी पेसा क्षेत्र व बिगर पेसा क्षेत्रातंर्गत शिक्षकांची तब्बल ९०९ रिक्त जागा आहे, ही संख्या मोठी असल्याचे सांगितले. मात्र पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती केली जात आहे. शासन आदेशाप्रमाणे सर्व पेसा क्षेत्रातील रिक्त जागा भरणे बंधनकारक असल्याने भरतीतून या जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

त्यानंतर उपाध्यक्ष झिरवाळ यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्याशी या विषयांबाबत चर्चा केली. शासन आदेशाप्रमाणे, पेसा क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे याच क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रीया राबविली जात आहे. रिक्त जागांच्या एकूण ८० टक्के म्हणजेच ३११ जागांची भरती प्रक्रीया राबविली जात असल्याची माहिती परदेशी यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

PESA Teacher Recruitment Schedule Announced nashik news
Nashik Farmers Protest : सदोष निवाड्याविरोधात चक्का जामचा इशारा; सुरत-चेन्नई बाधितांचे मोर्चातून शक्तिप्रदर्शन

बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याबाबत निर्देश नसल्याने या जागा भरता येणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उपाध्यक्ष झिरवाळ यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची भेट घेत भरतीबाबत चर्चा केली. त्यानंतर उपाध्यक्ष झिरवाळ यांनी याबाबत असलेले शासन आदेश, इतर कागदपत्रे, रिक्त जागांचा प्रस्ताव अशी कागदपत्रे द्यावी असे सांगत, यासंदर्भात शिक्षण आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा

शासकीय कन्या शाळेत सोमवारी दुसऱ्या टप्यातील ३०० पात्र शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने शासन आदेशप्रमाणे दाखले आहे की नाही, गुणपत्रक, जात प्रमाणपत्र तसेच समांतर आरक्षणाबाबती पडताळणी नेमण्यात आलेल्या समितीने केली.

भरती प्रक्रियेबाबत शिक्षण आयुक्त यांनी सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यात पेसा क्षेत्रात गरजेप्रमाणे पदवीधर शिक्षक भरण्यात यावे त्यानंतर अपदवीधारांना प्राधान्य द्यावे अशा सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे १२६ बी. एस्सी बी. एड धारकांना (विज्ञान) यांना संधी देणार आहोत. त्यानंतर १८५ कंत्राटी नेमणूक केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी स्पष्ट केले.

PESA Teacher Recruitment Schedule Announced nashik news
Nashik Onion Auction : नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कांदा लिलाव बंद; जिल्हा व्यापारी असोसिएशनचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.