Nashik News : तालुक्यात पोलिस पाटील संवर्गातील एकूण ६३ पदे रिक्त आहेत. पोलिस पाटील यांची १०० टक्के पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार गावनिहाय पोलिस पाटील संवर्गातील ६३ पदे आरक्षणानुसार भरण्यात येतील.
आरक्षणासाठी २० सप्टेंबरला सकाळी अकराला तहसील कार्यालयात संबंधित गावातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी केले आहे. (Vacancies of village wise police stations will be filled Nitin Sadgir Nashik News)
मालेगाव तालुक्यात आघार बुद्रूक, भारदेनगर, टोकडे, कळवाडी, लोणवाडे, वाके, साकुर, माल्हणगाव, मुंगसे, ज्वार्डी बुद्रुक, ज्वार्डी खुर्द, रोंझाणे, मांजरे, लेंडाणे, गुगुळवाड, खलाणे, येसगाव बुद्रुक, येसगाव खुर्द, कंधाणे, मेहुणे, झाडी, साकुरी नि., हाताणे, मळगाव, अजंदे बुद्रुक, माणके, जळगाव नि.,
दहिकुटे, कौळाणे नि., उंबरदे, नांदगाव बुद्रुक, पाडळदे, राजमाने, भिलकोट, सौंदाणे, रोझे, नागझरी, डाबली, पिंपळगाव, निमशेवडी, आघार खुर्द, निळगव्हाण, सातमाने, जेऊर, ढवळेश्वर, विराणे, पांढरुण, वजिरखेडे,
काष्टी, गाळणे, रामपुरा, पोहाणे, बोधे, कोठरे बुद्रूक, कोठरे खुर्द, शेरुळ, सावतावाडी, सायतपरपाडा, चंदनपूरी, दापुरे, भुईगव्हाण, निमगुले बुद्रुक, निमगुले खुर्द या गावातील पोलिस पाटील यांची पदे रिक्त आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
रिक्तपद भरतीसाठी अनुसूचित जाती- १२, विमुक्त जाती अ- २, भटक्या जमाती ब- २, भटक्या जमाती क-३, भटक्या जमाती ड-३, विशेष मागास प्रवर्ग-३, इतर मागास वर्ग- २३, ईडब्ल्यूएस- ६, खुला- ९ या आरक्षणप्रमाणे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
तसेच आरक्षित व अनारक्षित प्रवर्गातील रिक्त पदे भरताना महिलांसाठी समांतर ३० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. महिला आरक्षणासाठी सोडत पद्धतीचा वापर करण्यात येईल असेही श्री. सदगीर यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.