Nashik News: मोकळे भूखंड ठरताहेत आरोग्यासाठी डोकेदुखी; मालेगावात प्लॉटधारकांवर महापालिका मेहेरबानी

शहरातील बहुसंख्य मोकळे भूखंड काटेरी झाडे झुडपांनी व्यापलेले आहेत. हे मोकळे भूखंड कचरा डेपो झाल्याने मोकाट कुत्रे, डुकरे यांचा सुळसुळाट झाला आहे.
Grass and garbage growing on open plots in the middle class colony area of ​​the area.
Grass and garbage growing on open plots in the middle class colony area of ​​the area. esakal
Updated on

Nashik News : शहरातील बहुसंख्य मोकळे भूखंड काटेरी झाडे झुडपांनी व्यापलेले आहेत. हे मोकळे भूखंड कचरा डेपो झाल्याने मोकाट कुत्रे, डुकरे यांचा सुळसुळाट झाला आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून हे मोकळे भूखंड मिळकत धारकांवर महापालिका मेहेरबान असल्याचे जाणवते.

शहरातील शेकडो मोकळे भूखंड कचरा डेपो झाले आहेत. झाडाझुडूपांनी वेढलेले मोकळे भूखंड भुरट्या चोरांना लपण्याचे साधन देखील झाले आहे. (Vacant plots are creating problem for health nashik news)

वर्षानुवर्षे या भूखंडावरील घाण, कचरा उचलला जात नसल्याने गाजर गवत वाढते. उन्हाळ्यात नष्ट होते, पावसाळ्यानंतरच्या काळात त्या त्या भागातील मोकाट जनावरांचा व डुकरांचा वावर वाढतो. परिणामी अस्वच्छता पसरून रोगराई वाढ होते. आधीच वाढलेल्या नवनवीन वसाहती, बांधकामे, अडगळीत कामे यामुळे त्या-त्या परिसरातील नागरिकांनाही कचरा टाकण्यासाठी आयताचा डेपो मिळतो.

मनपासह अनेक भागात नागरिकही तेवढेच जबाबदार असल्याचे निदर्शनास येत आहे. काटेरी झाडांचे साम्राज्य वाढलेले आहे. चोरटे त्याचा पुरेपुर लाभ उठवितात. अनेक अवैध धंदे करणाऱ्यांसाठी अशा जागा फारच सोईस्कर ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कचरा कुंडीत न टाकता अडचणीच्या दुर्लक्षित जागांवर कचरा टाकतात. शहरातील अनेक ठिकाणी कुंड्यामधला कचरा उचलला जात नसल्याने मोकाट जनावरे व डुकरे पसरवितात. यासंदर्भात आरोग्य व स्वच्छता विभागाचे साफ दुर्लक्ष आहे.

'स्वच्छता गाडी व घंटा गाडी' मुख्य रस्त्यावर व मोठ्या कॉलनीत सोयीने चकरा मारतात. अशा मोकळ्या भूखंडावर असलेल्या गवत, कचरा यावर मोकाट जनावरांचा उच्छाद रोजचाच असतो. डास, चिलटे, मच्छरांचे साम्राज्य वाढण्यास मदत होते. त्यातून साथ आजार वाढीस लागतात. काटेरी झाडांचे साम्राज्य वाढलेले आहे.

Grass and garbage growing on open plots in the middle class colony area of ​​the area.
Chetak Festival: चेतक फेस्टिव्हल चमकला नाशिकचा ‘करण’; अश्‍वनृत्य स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक

यामुळे सध्या डेंग्यू सदृश आजार बळावण्याची शक्यता वाढली असल्याने महापालिका प्रशासनाने धूर फवारणी करण्याची गरज आहे. याकडे महापालिका आरोग्य व स्वच्छता विभागाबरोबरच संबंधित मिळकती वर्षातून किमान एकदा स्वच्छ करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.

''शहरातील अनेक भागात गेल्या दहा वर्षांपासून मिळकती घेऊन ठेवल्या आहेत. या मिळकती पासून संबंधिताचे उत्पन्न वाढते. मोकळ्या भूखंडाच्या आड अनेक अवैध उद्योग चालतात. मोकळ्या भूखंडावर असलेल्या गवत कचरा दरवर्षी साफ सफाई करायला पाहिजे अन्यथा महापालिका प्रशासनाने कारवाई करावी.'' - जगदीश गोऱ्हे, अध्यक्ष, वंदे मातरम् संघटना

"मालेगाव शहरातील वाढत्या वसाहतीत मोकळ्या भूखंडावर दुर्गंधी व अस्वच्छता जास्त आढळते. परिणामी रोगराई वाढ होत असते. अशा प्लॉटचा आधार मोकाट कुत्री जनावरेच काय माणसेही घेतात, त्यामुळे स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत." - शाम कासार, सामाजिक कार्यकर्ते

Grass and garbage growing on open plots in the middle class colony area of ​​the area.
Nashik News: इ- भंगारातून अर्थकारणाला गती! मालेगावच्या भंगार बाजारात मिळतात माफक दरात वस्तू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()