रॅपिड एंटीजन टेस्ट केल्यानंतरच संबंधित व्यक्तीला लसीचा डोस दिला जाणार आहे अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
नाशिक : महापालिकेच्यावतीने शहरांमध्ये लसीकरण(Vaccination) मोहीम 31 केंद्रांवर सुरू आहे लसीकरण करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती करून बाधित(Covid positive) आहे की नाही हे तपासणे गरजेचे असल्याने 21 केंद्रांवर रॅपिड एंटीजन टेस्टची(Rapid antigen test) सोय करण्यात आली आहे. टेस्ट केल्यानंतरच संबंधित व्यक्तीला लसीचा डोस दिला जाणार आहे अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. (Vaccination after rapid antigen test in Nashik)
सुपर स्प्रेडर रोखणं होईल शक्य
मिशन झिरो(Mission Zero) व मिशन लसीकरण(Mission Vaccination) अतंर्गत महानगरपालिका,भारतीय जैन संघटना,वॉटर ग्रेस कंपनी व नाशिक वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात अँटीजेन टेस्ट केंद्र सुरू करण्यात आले आहे. नाशिक महानगरपालिकेतर्फे ३१ लसीकरण केंद्र सुरु आहे. त्याठिकाणी लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये.त्यासाठी लस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची अँटीजेन टेस्ट करून घेणे गरजेचे आहे . जेणे करून कोणी नागरिक त्याठिकाणी सुपर स्प्रेडर(Super sprader) असल्यास कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. तरी नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रावर आल्यास त्यांनी अँटीजेन टेस्ट करून लस घ्यावी व नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे जीवशास्त्रज्ञ (Biologist) डॉ. राजेंद्र त्र्यबंके यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.