Nashik Water Crisis: वागदर्डी धरणाने गाठला तळ; मनमाड शहरावर पाणी टंचाईचे संकट

Vagdardi dam with dead stock remaining.
Vagdardi dam with dead stock remaining.esakal
Updated on

Nashik Water Crisis : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठला असून केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मनमाड शहरावर पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे.

धरणात मुबलक पाणी नसल्याने पालिकेतर्फे महिन्यातून एकदा पाणी पुरवठा केला जात असून पाण्यासाठी शोधाशोध करण्याची वेळ मनमाडकरांवर आली आहे.

त्यामुळे पालखेडचे आवर्तन तत्काळ सोडण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. (Vagdardi Dam Hits Bottom Water scarcity crisis in Manmad city Nashik Water Crisis)

पावसाळा सुरु होऊन दोन महिने होत आले असताना तरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला नसल्याने धरणातील पाण्याने तळ गाठला आहे.

त्यामुळे सव्वा लाख लोक संख्या असलेल्या शहराला पाणी आणावे कुठून ? असा प्रश्न पालिकेला पडला आहे. वागदर्डी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस झालाच नसल्याने धरणात पावसाचे पाणी आले नाही.

त्यामुळे सर्व मदार आता पालखेड धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर आहे. दोन महिन्यापूर्वी मिळालेल्या आवर्तनाच्या पाण्यातून पालिकेने शहरात महिन्यातून दोन वेळा पाणी पुरवठा केला.

मात्र आता तर धरणातील पाणी साठा संपुष्टात आल्यामुळे शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ महिलांवर आली आहे.

पालखेड धरणाचे आवर्तनाचे पाणी सोडल्यामुळे इतक्या दिवस पाणी पुरले. धरणात असलेले पालखेडच्या आवर्तनाचे मिळालेले पाणी आता संपले असून धरणाने तळ गाठला आहे. केवळ मृतसाठाच शिल्लक आहे.

यातही सध्या २० ते २२ दिवस दिवसाआड शहराला महिन्यातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. धरणातील आवर्तनाचे पाणी संपले तर पावसाचे नैसर्गिक पाणीही नाही. त्यामुळे मनमाडकर चिंतेत सापडले आहे.

पाणी टंचाईचे संकट गडद

पाटोदा येथील साठवण तलावही पावसाअभावी कोरडाठाक पडला आहे. पहिजे तेवढा पाऊस पडला नसल्याने भूगर्भातील भूजल पातळीही खालावली असल्याने शहरातील कूपनलिका, विहिरीही कोरड्या ठाक पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे शहराला अधिक पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पालिकेतर्फे महिन्यातून एकदा केला जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असले तरी वापरण्यासाठी विकत पाणी घेऊन गरज भागवावी लागत आहे.

शहरातील विविध जलकुंभावर असलेल्या नळांवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. त्यामुळे पाणी टंचाईची टांगती तलवार शहरावर कायम असून पाणी टंचाईचा विचार करून पालखेडचे आवर्तन सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vagdardi dam with dead stock remaining.
Nashik Water Crisis: जलकुंभ उदंड, तरीही पाण्याचा ठणठणाट; नियोजनाअभावी टंचाई

२५ दिवस पुरेल एतका साठा

वागदर्डी धरणात शिल्लक पाणीसाठा हा २० ते २५ दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी पालिकेने शहरातील विहिरी अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला असून शहर परिसरातील ११ खासगी विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला आहे.

त्यानुसार आययूडीपी प्रोफेसर कॉलनी, ललवाणी बिल्डींग वाडा, ललवाणी बिल्डींग धर्मशाळा, अश्विनी नगर गुजराथी मळा, शिवाजी चौक, संत बाबा शाळेच्या मागे, कॅम्प प्राथमिक शाळेजवळ, आदर्श नगर कॅम्प, आययूडीपी खाकी बाग, सिद्धिविनायक नगर, दराडे वस्ती या ठिकाणच्या खासगी विहिरी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत.

"वागदर्डी धरण परिसरात अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्यामुळे धरणात पाणी येऊ शकले नाही. तर धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा कमी होऊन तळ गाठत आहे. शहरावर पाणी टंचाईचे सावट दिसत असून शहर आणि परिसरातील ११ खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविले आहे."

- डॉ. सचिनकुमार पटेल, मुख्याधिकारी, मनमाड

"मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात आता केवळ १२ ते १५ दशलक्ष घनफूट पाणीसाठाच शिल्लक असून शहराला एकदाच पाणीपुरवठा होऊ शकतो. आवर्तनाचे पाणी मिळाल्यास टँकर परिस्थिती उद्भवणार नाही."

- अमृत काजवे, पाणीपुरवठा अधिकारी, मनमाड

Revenue Week: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास नवसंजीवनी; महसूल सप्ताहात प्रशासनाकडून मदतीचा हात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.