Success Story: ‘माझ्या पोरीनं पांग फेडले गं बाई...’ वंदना शिंदे-गायकवाड यांनी केले कुटुंबीयांच्या श्रमाचे चीज

vandana shinde gaikwad
vandana shinde gaikwadesakal
Updated on

Success Story : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दरवर्षी विविध पदांसाठी परीक्षांसाठी काही जण मोठे क्लासेस लावतात. यात काही विद्यार्थी कोणताही क्लास न लावता अधिकारी झाले. याचे एक उदाहरण म्हणजे निफाड तालुक्यातील वंदना शिंदे-गायकवाड. (Vandana Shinde Gaikwad of Niphad taluka success story of MPSC Exam nashik)

संसाराचा गाडा ओढत मिळविले यश

वंदना शिंदे-गायकवाड ओझरमिग येथील शेतकरी अशोक शिंदे यांच्या कन्या, तर वाकद शिरवाडे (ता. निफाड) येथील अशोक गायकवाड यांच्या सून. लग्नानंतर सासरची जबाबदारी अंगावर आल्यानंतर मुलींना शिक्षण करणे अवघड होते.

मात्र, आवड आणि इच्छा असली, तर सर्व काही शक्य होते. वंदना यांनी संसाराचा गाडा यशस्वीपणे सांभाळत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालयाच्या सहायक संचालकपदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत माहेर अन्‌ सासरचे नाव उज्वल केले आहे. नोकरी व घर कामातून वेळ काढून वंदना यांनी परीक्षेत यश मिळविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

vandana shinde gaikwad
Success Story: जिद्द, चिकाटीच्या जोरावर जगदीशची यशाला गवसणी! पहिल्याच प्रयत्नात कृषी अधिकारी

मेहनत पाहून पतीची साथ

वंदना यांचे प्राथमिक शिक्षण ओझर येथील अभिनव बालविकास मंदिर, तर माध्यमिक शिक्षण माधवराव बोरस्ते विद्यालयात झाले. नाशिक येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका, तर अमरावती येथील शासकीय महाविद्यालयात २०१५ मध्ये पदवी प्राप्त केली.

वंदना यांना सुरवातीपासून अभ्यासाची आवड होती. काहीतरी करून दाखवायचे, सर्वसामान्यांची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यानुसार त्यांनी घरचा संसार सांभाळत एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. लग्नानंतरही परीक्षेची तयारी सोडली नाही.

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात वंदना यांना पती अमोल यांची मोलाची साथ मिळाली. अमोल हे उच्चशिक्षित असून, केएसबी कंपनीत आहेत.

वंदना यांनी यापूर्वी एमपीएससीची परीक्षा दिली होती. मात्र, त्यात यश मिळाले नाही. खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून कुटुंबीयांना सुखद धक्का दिला.

"अनेक वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होण्याचे स्वप्न बघितले. ते यानिमित्ताने पूर्ण झाले. या यशात कुटुंबीयांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या पाठिंबाशिवाय हे शक्य नव्हते." -वंदना शिंदे-गायकवाड

"वंदना शिंदे-गायकवाड यांच्या यशस्वितेने शिंदे परिवारासह सर्वांच्या आनंदात भर पडली आहे. लेकीचे यश नक्कीच कौतुकास्पद आहे." -राजेंद्र शिंदे, अध्यक्ष, ओझर मर्चंट्स को-ऑप बँक

vandana shinde gaikwad
Success Story : वृत्तपत्र, भाजीपाला विक्रेत्याची यशाला गवसणी! राहुलचे चार महिन्यांत तब्बल 3 सिलेक्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.