Nashik News: सगर शिक्षण संस्थेत वरंदळांच्या 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग; मतदारांनी घडवले 'परिवर्तन'

परिवर्तन पॅनलचा १५ जागांवर विजय, 'विकास'ला एकही जागा नाही
Sagar Vidya Prasarak Shikshan Sanstha's five-yearly elections candidates of the elected transformation panel cheering
Sagar Vidya Prasarak Shikshan Sanstha's five-yearly elections candidates of the elected transformation panel cheeringesakal
Updated on

Nashik News : सिन्नर शहरातील नावाजलेल्या सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ आणि सचिव विष्णुपंत बलक यांच्या विकास पॅनलला एकही जागा निवडून दिली नाही.

माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे आणि नामदेव लोणारे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला हाती एक हाती सत्ता देत मतदारांनी 'परिवर्तन' घडवून आणले.

या विजयाने चंद्रकांत वरंदळ यांच्या गेल्या २० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला असून त्यांना संस्थेतून पायउतार व्हावे लागले आहे. (Varandal 20 year power comes end in Sagar Shikshan Institute Voters victory to parivartan Nashik News)

नामदेव प्रताप लोंढे (२७८८) यांनी चंद्रकांत विष्णु वरंदळ (११८०) यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे ताब्यात घेतली. तर नामदेव विष्णू लोणारे (२४०९) यांनी विद्यमान सचिव विष्णुपंत किसन बलक (१५५१) यांचा दारुण पराभव करत सचिवपदावर विराजमान झाले.

संचालक पदाच्या निवडणुकीत गावठा विभागात सुधाकर लक्ष्मण गोळेसर (२६७८), दत्ता उद्धव झगडे (२४२२), दत्तात्रय पोपटराव लोणारे (२३२९) हे विजयी झाले. तर कैलास नामदेव झगडे (१२१०), किरण नामदेव लोणारे (१०९८), विजय मुरलीधर वरंदळ (१३०७) पराभूत झाले. महिला राखीव गटात सरला नवनाथ वरंदळ (२५६६) यांनी मनीषा संजय लोणारे (१३७९) यांचा पराभव केला.

भाटवाडी येथून मधुकर किसन खर्जे (२५७६) यांनी योगेश गणपत पाचोरे (१३९०) यांचा पराभव केला. इतर विभागातून जुगल भागिनाथ गवळी (२८५९) यांनी मधुकर लक्ष्मण नन्ने (१०७९) यांना पराभूत केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sagar Vidya Prasarak Shikshan Sanstha's five-yearly elections candidates of the elected transformation panel cheering
International Satsang Ceremony: समर्थ सेवा मार्गाचा नेपाळमध्ये भव्य आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळा

लोंढे गल्ली विभागातून दत्तात्रय पांडुरंग गोळेसर (२४०४), दत्तात्रय दादा लोंढे (२२९४), संदीप भाऊशेठ गवळी (२२७६), रामनाथ दत्तात्रय बलक (२१५०) विजयी झाले. तर राजेंद्र नामदेव आंबेकर (१५२१), सदाशिव किसन गोळेसर (१३६६), संजय बाळासाहेब मिठे (१३६३), संजय दादा लोंढे (१३०८) यांना पराभवाचे धनी व्हावे लागले. महिला राखीव गटात मंगल श्याम झगडे (२२२७) यांनी अर्चना राजेंद्र बलक (१७१६) यांना चीतपट केले.‌

लोणारवाडी येथून दिगंबर रामभाऊ पगार (२४०७), संजय विष्णुपंत माळी (२२५५) विजयी झाले. त्यांनी दत्तात्रय भारत पाचोरे (१४४०), ज्ञानेश्वर खंडू लोणारे (१४२७) यांचा पराभव केला.

सदर शिक्षण संस्थेच्या संगमनेर नाका येथील संकुलात निवडणूक निर्णय अधिकारी एडवोकेट अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला प्रारंभीपासूनच परिवर्तन पॅनलने आघाडी घेतल्याने घेतली ती शेवटपर्यंत कायम टिकून राहिली जवळपास एक हजाराच्या मतांनी परिवर्तन चे सर्व उमेदवार निवडून आले.

Sagar Vidya Prasarak Shikshan Sanstha's five-yearly elections candidates of the elected transformation panel cheering
Gurumauli Annasaheb More: कुलधर्म, कुलाचार नव्या पिढीपर्यंत पोचवा : गुरुमाऊली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.