Nashik Revenue Week : महसूल सप्ताहानिमित्त नोंदणी व मुद्रांक विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येणार आहे.
त्यात, सलोखा, ई-रजिस्ट्रेशन, विवाह नोंदणी आणि महिला खरेदीसह शैक्षणिक कर्जात सवलतीच्या उपक्रमाचा लाभ दिला जाणार आहे. (Various activities of Registration Stamp Department on occasion of Revenue Week nashik)
सलोखा योजनेत शासनाच्या ३ जानेवारीपासून शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील वाद मिटविणे व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमध्ये सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी, शेतजमीनधारकांचे अदलाबदल दस्तऐवज यासाठी मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये व नोंदणी फी नाममात्र रुपये एक हजार आकारण्यात येतात.
या सलोखा योजनेमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुद्रांकशुल्क व नोंदणी फी यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
ई-रजिस्ट्रेशन योजनेत नोंदणी व मुद्रांक विभागाने बांधकाम व्यावसायिक यांना आणि खरेदीदार यांच्यातील प्रथम विक्रीचा करार, म्हाडा वाटप पत्र, सिडको लीज वाटप पत्र, SRA, PMAY यासाठी ऑनलाइन ई-रजिस्ट्रेशन प्रणाली विकसित केली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यासाठी ई-रजिस्टेशन सेल्फ पोर्टल विकसित केले असून, पोर्टलच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायिकांना या सुविधेत स्वत:चे टेम्पलेट तयार करणे, त्यांची ऑनलाइन पडताळणी करणे व दस्तऐवज तयार करून त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ही सुविधा www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन या सदराखाली e-registration ठिकाणी उपलब्ध आहे.
विशेष विवाह कायदा १९५४ नुसार विवाह प्रमाणपत्र दिले जाते. सध्या विवाह नोंदणीसाठी विभागामार्फत नवीन मॅरेज दोन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून अर्जदाराला विवाह नोंदणी कार्यालयात न जाता नोटीस/अर्ज किंवा कागदपत्रे ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन या सदराखाली विवाह नोंदणी ठिकाणी उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.