Majhi Mati Majha Desh Campaign : केंद्र सरकारचे ‘माझी माती- माझा देश’ अभियान येथील पंचायत समिती कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावातील माती कलश पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला दिल्ली पाठविणार आहे. (Various activities under Majhi Mati Maza Desh campaign in Yeola Panchayat Samiti nashik news)
या अभियानांतर्गत तालुक्यातील शाळा, ग्रामपंचायतीत शिलाफलकाची उभारणी करण्यात येत असून, शिलाफलकावर आजादी का अमृतमहोत्सवाचा लोगो, पंतप्रधान मोदींच्या व्हीजन २०४७ संदेश, स्थानिक शहीद वीरांची नावे आदी नमूद करण्यात येत आहे.
शिवाय वसुधा वंदन, स्वातंत्र्यसैनिक व वीरांना वंदन, पंचप्रण शपथ घेण्यात आली. प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करून ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व राज्याचे नाव पेंटींग करून हा कलश २७ ते ३० ऑगस्टदरम्यान पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेऊन जाणार आहे.
वसुधा वंदन म्हणून ७५ देशी वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. तालुका स्तरावर अमृतसरोवर शाळा, पंचायत समिती, ग्रामपंचायत या ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविण्यात येणार आहे. हर घर तिरंगा उपक्रम मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. रविवारी (ता. १३) श्री. साबळे व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली.
प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमार्फत प्रभातफेरी, रांगोळी, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून, ग्रामपंचायत स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समन्वयाने आरोग्य तपासणी शिबिर घेतले जात आहेत.
सर्व शासकीय कार्यालय साफसफाई मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची विविध माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी गावात दवंडी, बैठका व सादरीकरण उपक्रम राबविण्यात येत आहेत.
ग्रामपंचायत, पंचायत समितीस्तरावर लेखाशक निपटारा मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पंचायत समितीचे कक्षाधिकारी संजय कुमावत यांनी दिली. १५ ऑगस्टला ध्वजवंदन राष्ट्रगीत व राज्य गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात येऊन वीरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.