Ashadhi Wari 2023 : रिंगण सोहळ्याच्या वैभवाची दातलीतील गोल रिंगणावेळी चुणूक!

varkari experienced Sant Dnyanoba Mauli palkhi round arena at arena in Datli nashik news
varkari experienced Sant Dnyanoba Mauli palkhi round arena at arena in Datli nashik newsesakal
Updated on

Ashadhi Wari 2023 : टाळ-मृदुंग, वीणाच्या स्वरांना ‘ज्ञानोबा-माऊली’ अन ‘निवृत्तीराया, निवृत्तीराया...सोपान, मुक्ताबाई, ज्ञानसखाया’ अशा भजनांचा साज चढवत दातली (ता. सिन्नर) येथे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण दोन दिवसांपूर्वी सकल संपन्न झालयं.

आळंदीहून पंढरीकडे रविवारी (ता. ११) प्रस्थान करणाऱ्या संत ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण वैभवाची चुणूक दातलीतील रिंगणावेळी वारकऱ्यांनी अनुभवली. (varkari experienced Sant Dnyanoba Mauli palkhi round arena at arena in Datli nashik news)

वैभवाच्या चुणूकचं कारणही तसं यंदा वेगळं राहिले. ते म्हणजे, संत ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे चोपदार रामभाऊ, राजाभाऊ महाराज रंधवे आदी गोल रिंगणासाठी मार्गदर्शन करत असतात. त्यापैकी रामभाऊ, राजाभाऊ यांच्यासमवेत वेदांत यांना दातलीतील रिंगण सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

खरे म्हणजे, वेगळी परंपरा, मानापमान अशा गोष्टी घडू नये. उलटपक्षी त्यांचा सन्मान राखला जाईल. त्यांच्या मार्गदर्शनात हस्तक्षेप होणार नाही याची काळजी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर संस्थानचे विश्‍वस्त माधवदास राठी महाराज, श्रीपाद महाराज कुलकर्णी यांच्यासह इतरांनी आणि ग्रामस्थ, मानकऱ्यांनी घेतली.

रामभाऊ महाराजांनी त्र्यंबकेश्‍वर ते पंढरपूर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या सप्तशतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी पालखी सोहळ्यात वारकरी म्हणून सहभागी झाल्याचे आनंदाने सांगताच, वारकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

varkari experienced Sant Dnyanoba Mauli palkhi round arena at arena in Datli nashik news
Sant Dnyaneshwar Maharaj : हरिनामाच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पंरपरेत मानाच्या पालख्या म्हणून गणल्या जाणाऱ्या आळंदीच्या संत ज्ञानोबा माऊली, देहूच्या संत तुकोबाराय महाराज, त्र्यंबकेश्‍वरच्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, पैठणच्या संत एकनाथ महाराज, मुक्ताईनगर-जळगावच्या मुक्ताबाई, सासवडच्या संत सोपानकाका महाराज आणि पंढरपूरमधील संत नामदेव महाराज पालखीचा समावेश आहे.

सामाजिक समतेचा प्रबळ विचार देणारे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना वारकरी संप्रदायामध्ये मोठे महत्त्व दिले जाते. त्र्यंबकेश्‍वरहून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याची सुरवात संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्याप्रमाणे व्हावी याची परंपरा यंदापासून सुरु करण्यात आली.

देहू आणि आळंदीप्रमाणे त्र्यंबकेश्‍वरमधून आदल्यादिवशी म्हणजे, २ जूनला पालखीने प्रस्थान केले. त्याचदिवशी त्र्यंबकेश्‍वरमधील गुरुघरी म्हणजे, प्रयाग तीर्थजवळील महानिर्वाण आखाडामध्ये पहिला मुक्काम झाला. त्यामुळे वारकरी, दिंड्यांची होणारी धावाधाव कमी झालीयं.

varkari experienced Sant Dnyanoba Mauli palkhi round arena at arena in Datli nashik news
Sant Tukaram Maharaj : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान

दीडलाखांवर वारकऱ्यांचा सहभाग

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात रथाच्यापुढे चार आणि रथाच्या मागे ४५ अशा एकूण ४९ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. यापूर्वी आजच्या गोगलगावमधील मुक्कामापर्यंत पालखी सोहळ्यात २० हजारापर्यंत वारकऱ्यांचा सहभाग असायचा. आजच्या मुक्कामापर्यंत सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या २५ हजारापर्यंत पोचलीयं.

नगरमध्ये १५ जूनला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा होणार आहे. हा सोहळा आटोपून पालखी सोहळा पुढे निघेल त्यावेळी सहभागी वारकऱ्यांची संख्या दीड लाखापर्यंत पोचेल, असे चोपदार सागर दौंड यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळाळले तेज

गोल-उभे रिंग हे वारकऱ्यांसह भाविकांसाठी परमोच्च आनंदाचा क्षण असतो. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दातलीच्या गोल रिंगणानंतर उन्हाळ्याची धग कधी पळून गेली हे समजले नाही आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर तेज झळाळले. खरे म्हणजे, गोल रिंगणामधून अश्‍व धावला आणि त्याच्या पावलांच्या जागेतील माती कपाळी लावली की झालं, असा काहीसा भाव अनेकांच्या मनात असतो.

varkari experienced Sant Dnyanoba Mauli palkhi round arena at arena in Datli nashik news
Sant Nivruttinath Palakhi : निवृत्तीनाथ पालखीची जिल्हा सरहद्दीवरील वाट खड्ड्यांतून...

पण गोल रिंगण लावणे ही सुद्धा अदभूत कला-कौशल्याचा भाग असतो याची प्रचिती दातलीत अनेकांना आली. अश्‍वासाठीचे बाह्य रिंगण झाले, की आतील गोल देव रिंगण लावले गेले. टाळकरी, पखवाजवादक, विणेकरी, तुळशीवृंदावन डोईवर घेतलेले, झेंडेधारक क्रमाक्रमाने रिंगणातून धावलेत.

पंधरा मिनिटांचा खेळ झाल्यावर चोपदारांनी तीन वेळा उडी मारली अन गोल रिंगणाची सांगता झाली. गोल रिंगणाला वैभव प्राप्त होण्यासोबत सांस्कृतिक परंपरेची शिस्त लावण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे राठी महाराज आणि कुलकर्णी महाराजांनी सांगितले. निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उभे रिंगण २० जूनला धांडेवस्ती (कर्जत) येथे, तर गोल रिंगण २५ जूनला परिते (करकंब-पंढरपूर) इथे होणार आहे.

"पारगाव ते तळेगाव हा ९ किलोमीटरचा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा मार्ग खराब आहे. तसेच खंबाळे ते पारगाव हा २२ किलोमीटरचा मार्ग ठीक नाही. महाराष्ट्राच्या वैभवाच्यादृष्टीने ही बाब ठीक वाटली नाही. तसेच इतर पालखी सोहळ्याच्या मार्गाप्रमाणे त्र्यंबकेश्‍वर ते पंढरपूर या पालखी मार्गाची माहिती देणारे फलक आढळत नाहीत. त्यासंबंधीची दखल घेतली गेल्यास वारकऱ्यांमध्ये उत्साह दुणावेल." - माधवदास महाराज राठी आणि श्रीपाद महाराज कुलकर्णी

varkari experienced Sant Dnyanoba Mauli palkhi round arena at arena in Datli nashik news
Sant Nivruttinath Palakhi : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्याचा नगर जिल्ह्यात प्रवेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.