Nashik News : निष्णात कर्मयोगाचा दीपस्तंभ मावळला; ह.भ.प. रुंजाबाबा गुळवे यांचे निधन

Nashik news
Nashik newsesakal
Updated on

अस्वली स्टेशन : आध्यात्मिक क्षेत्रात ज्ञान,भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी संगमातून निस्वार्थ सेवेचा नवा अध्याय रचणारे वारकरी सांप्रदायाचे निष्णात कर्मयोगी पांडुरंगाचे निस्सीम भक्त ह.भ.प.रुंजा बाबा गुळवे (वय ९६) यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून वृद्धत्वामुळे यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती.

Nashik news
Mahatma Gandhi Jayanti : महात्मा गांधींचे ९ विचार जे तुम्हालाही देतील जगण्याचा नवा मार्ग

निष्ठा अन् श्रध्देने परमार्थ करणारा कर्मयोगी

श्रद्धा, विश्वास आणि भक्ती या त्रिसूत्री नुसार परमार्थ करत वारकरी सांप्रदायाचे गाढे अभ्यासक तसेच प्रचार-प्रसार त्यांनी केला. कुठल्याही प्रकारे द्वैतभाव न ठेवता संपूर्ण निष्ठेने आणि श्रध्देने परमार्थ कसा करावा हा आदर्श त्यांनी लाखो वारकऱ्यांसमोर ठेवला.

जोग महाराज भजनी मठातील संस्थानच्या या अवाढव्य कारभाराचे नियोजन आणि नियंत्रण करण्याची निस्वार्थ शैली त्यांनी जोपासली होती. मठाधिपती माधव बाबांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते. आषाढी-कार्तिकी पंढरपूरची वारी तसेच त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथांची वारी ते निष्ठेने करीत असत.

Nashik news
Mahatma Phule Death Anniversary: महात्मा फुले यांच्या आयुष्यातील महत्त्वपुर्ण घटना...

माधवबाबांच्या सानिध्यात त्यांनी वारकरी सांप्रदायाचा हा वेलू महाराष्ट्रभर नेण्याचे काम केले. असा हा पारमार्थिक कर्मयोगाचा दीपस्तंभ विझला. रुंजाबाबाच्या निधनाने इगतपुरी तालुक्यातील वारकरी सांप्रदायाची पंढरी पोरकी झाली असून संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.