Varun Sardesai : नवीन टीम घेऊन संघटनेची बांधणी करणार असल्याचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले. ठाकरे गटातून शिवसेनेच्या शिंदे गटात अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.
यांसह युवा सेनेतदेखील मोठी फूट पडली. (Varun Sardesai statement about building organization with new team nashik news)
त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांच्या जागा रिक्त होत्या. पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या करण्यासाठी शिवसेना आणि युवा सेनेतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. याकरिता युवा सेना सचिव वरुण सरदेसाई शुक्रवारी (ता. ३०) नाशिकमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
युवा सेना आणि युवती सेना कार्यकारिणीतील विविध पदांसाठी अनेक तरुण-तरुणी शहरातील शालिमार परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय येथे जमले होते. ठाकरे गटातून शिंदे गटात युवा सेनेचेही अनेक तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रवेश केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे युवा सेना कार्यकारिणीमध्ये पदाधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. याकरिताच युवा सेना आणि युवती सेना यांच्या मुलाखती सुरू झाल्या असल्याची माहिती वरुण सरदेसाई यांनी दिली. नाशिकमध्ये पक्षसंघटन मोठे आहे.
गावात एकनिष्ठ शिवसैनिक नव्या दमाच्या तरुणाईसोबत पक्षसंघटन वाढवत काम करणार, असेही सरदेसाई यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार याबाबत सरदेसाई यांना विचारणा केली असता, राहुल माझा चांगला मित्र आहे. इतके दिवस आम्ही एकत्र काम केले, मात्र आता सत्ता गेली आहे पण लोक नवनवीन कारणे देत बाहेर पडत आहे, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.