Nashik Political : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्फे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक असलेल्या नाशिक मर्चंट सहकारी बँकेचे (नामको) अध्यक्ष माजी आमदार वसंतराव गिते यांनी जोरदार तयारी चालविली आहे.
मागील पंचवार्षीक निवडणुकीचा ब्रेक घेतल्यानंतर नव्याने जोमाने तयारीला लागलेल्या गिते यांनी नेटाने बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहेच. सोबतच मध्यच नव्हे तर शहरात यावेळी चारही आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेच असतील, असा दावा श्री. गिते यांनी केला. (vasant gite prepared for upcoming elections from shivsena thackeray group nashik political news)
आगामी निवडणुकांसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी चालविली आहे. विविध राज्यातील निवडणूकांमध्ये केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकारला संधी द्या, असे आवाहन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडे मात्र नाशिकच्या महापालिकेचीही सत्ता होती.
असे ट्रिपल इंजिन सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांनी दिलं काय? असा प्रश्न करीत गिते व त्यांचे समर्थक मोर्चेबांधणीत व्यस्त आहे.
एकेकाळी राजकारणात नवख्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोर्चेबांधणी करतांना तीन आमदार निवडण्यात योगदान राहिलेल्या गिते यांनी मागच्या पंचवार्षिकला निवडणूक लढली नाही. मागील पंचवार्षीकचा ब्रेक घेतल्यानंतर आता पुन्हा तयारी चालविली आहे.
जुनाच पक्ष, वर्षानुवर्षाचे जुने सहकारी मित्र, तेच नाशिक मध्य विधानसभेचे रणांगण अशा वातावरण यंदा महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची साथ असल्याने गिते यांची मोर्चेबांधणी ठसठसीत नजेरत भरावी अशीच आहे.
श्री. गिते सध्या उत्तर महाराष्ट्रात अग्रणी असलेल्या दीड हजार कोटीहून अधिकच्या ठेवी आणि एक लाख ९० हजाराहून अधिक सभासद असलेल्या नामको बॅकेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनेत घर वापसी केल्यानंतर ते त्यांच्या वर्षानुवर्षाच्या सहकाऱ्यांसोबत शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय आहेत.
शहरातील सगळ्या प्रभागात नव्याने प्रभागप्रमुखांसह नव्या दमाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बुथनिहाय बांधणीत कंबर कसली आहे. त्यामुळेच मध्य विधानसभा मतदार संघात आतापासूनच चूरस दिसायला लागली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
डोक्यावर घेता तसे....
शिवसेनेच्या बैठकीत सध्या भाजप रडारवर आहे. ज्या नाशिकने अध्यात्म, कला, साहित्य संस्कृती, परिवर्तनासह सामाजिक क्रांतीच्या वाटचालीत अनेकांना दत्तक घेत मोठे केले. दिवंगत वसंतराव गुप्ते, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे दिग्गज दत्तक घेतले.
असे नाशिक दत्तक घेण्याची घोषणा म्हणजे भंपकपणाच आहे. दत्तक घेणारे हे कोण? दत्तक घेऊन केले काय? उलट महापालिकेच्या १९९२ स्थापनेपासून कधीही जे घडले नाही, असे महिन्याला विनाकारण ४ कोटी रुपये सिटी लिंकला देण्याचा अजब प्रकार भाजपच्या सत्ताकाळात पहायला मिळाला.
परिवहन सेवेच्या बस खासगी संस्थाना देउन सेवा चालविली आली असती, सामान्य कष्टकरी, हातावर पोट असलेल्या नाशिककरांच्या कर, पाणीपट्टीच्या रुपाने जमा दर महिन्याला कोट्यवधीचा भुर्दंड कुणाच्या खिशात घालत आहे.
आयटी पार्कपासून तर अनेक घोषणांचे झाले काय, मिळकत विभागात आणि टीडीआर प्रकारात ११०० ते १२०० कोटीचा गैरव्यवहार महापालिकेत झाल्याचा आरोप करीत जे नाशिककर डोक्यावर घेतात तेच पायीखाली घेतात, याची मतदारांना आठवण करुन देत भाजप विरोधात गिते व त्यांच्या समर्थकांनी रान उठविले आहे.
सत्ता तर आपलीच...
सगळ्याच पातळ्यावर अपयशी ठरलेल्या भाजपला निवडणुका घ्यायची भिती वाटत आहे. इतर मागासवर्गीय मतदार या पक्षापासून दूर गेला आहे. त्यामुळे मंत्री असूनही ज्यांना उमेदवारी नाकारली अशा चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष करावे लागले.
माजी मंत्री छगन भुजबळ यांना दोन वर्षे तुरुंगात खितपत ठेवले. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारखे स्वपक्षातील नेत्यांची अवहेलना सुरु आहे. पण सीबीआय, इडीच्या धाक दाखवित विरोधकांचा जनआक्रोश फार काळ थांबविता येणार नाही.
निवडणुकीत मध्यच नव्हे तर शहरातील चारही जागा जिंकणार अशा स्वरुपाच्या प्रचारातून सध्या मध्य विधानसभेत गिते यांनी मतदार संघात धुराळा उडवून दिला आहे.
"मध्य मतदार संघातून तयारी सुरू आहे. शिवसेना हाच बिनजातीचा पक्ष आहे. या पक्षात सायकलवाला, रिक्षावाला आणि बुरुडगल्लीतील व्यावसायीक इथे लोकप्रतिनिधी झाले. शिवसेनेला जात माहिती नाही. अनेक वर्षे सोबत एकत्र काम करणारे आम्ही सगळे एकजुटीने शहरात काम करत आहोत. कधी कुणाची जात न विचारणाऱ्या आमच्या बिनजातीचा पक्षाला शहरातील मतदार स्विकारतील." - वसंतराव गिते, माजी आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.