नरकोळ : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील गावांसह तालुक्यातील गावागावात आज गुरुवार ९ रोजी वसुबारस पुजनाने दिवाळीस प्रारंभ झाला असून या उत्सवानिमित्त चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. (Vasu Baras Festival walis begins with Vasu Baras Puja in villages of Baglan West side of Taluka nashik)
पश्चिम पट्ट्यात आजही पशुधन मोठ्या प्रमाणात असून गायीला देवता मानतात प्रत्येक शेतकऱ्यांकडे आपल्या दारी गायीला महत्व आहे. पारंपरिक पद्धतीने गायीची पूजा करण्यात नवीन पिढीला यांची शिकवण मिळाली हा उद्देश यामागे आहे.
वसुबारस पुजनाने दिवाळीला महत्व असते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या बाराव्या प्रकाश दिवशी वसुबारस साजरा केला जातो. वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस असे, या शब्दाचे प्रचलित आहे. या दिवशी सौभाग्यवती गाय वासराची पूजा करते.
"शेतकऱ्यांच्या दारी गायीला महत्व आहे. वसुबारस पुजनाने घरात नवचैतन्य प्रकाशमय वातावरण निर्माण होते. नवीन पिढीला याबाबत कल्पना यावी, हा वसुबारस पुजनामागील उद्देश आहे." -जिजाबाई देवरे, सारदे ता.बागलाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.