Vat Purnima 2023 : काय आहे वटसावित्रीमागचे विज्ञान? जाणून घ्या...

Vat Purnima
Vat Purnimaesakal
Updated on

Nashik News : आपण मोठ्या भावभक्तीने वटसावित्री पौर्णिमा दरवर्षी साजरी करतो. आमच्या माता भगिनींचा तर हा सण मोठ्या आवडीचा. सावित्रीने यमाच्या दारातून आपल्या पतीला परत आणले. (vat purnima 2023 science behind Vat Savitri puja nashik news)

पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या या सणामागे किंवा व्रतामागे विज्ञान किंवा पर्यावरणाचा विचार आपल्या पूर्वजानीं दिला आहे, ही गोष्ट सर्व माता भगिनींनी लक्षात घ्यावी, असे आवाहन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रधान केंद्र दिंडोरी येथे दर गुरुवार, रविवारी देशभरातून हजारो स्वामी भक्त, सेवेकरी, भाविक आपापल्या समस्या, प्रश्न, अडीअडचणी घेऊन येतात. स्वामी महाराज यातून मार्ग दाखवतील असा विश्वास यामागे असतो. या हजारो लोकांशी बोलताना गुरुमाऊलींनी वरील आवाहन आज (ता.१) केले.

आज नेहमीप्रमाणे सकाळी भूपाळी आरती, त्यानंतर नैवेद्य आरती झाली आणि मग गुरुमाऊलींनी मार्गदर्शन केले. दुपारी पालखी यात्रा आणि पुन्हा प्रश्नोत्तरद्वारे मार्गदर्शन आणि सायंकाळी आरती, या उपक्रमात सर्व भाविक सहभागी झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vat Purnima
Vat Purnima 2023 : वट पौर्णिमेला पारंपरिक पूजे बरोबर करा हे उपाय, घर सुख-समृद्धीने भरेल

आपल्या हितगुजात गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा उल्लेख करून शिवकार्याचा गौरव केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा गौरव करतांना ते म्हटले, ३०० वर्षांपूर्वी रस्ते, झाडे, बारव, विहिरी अश्या मूलभूत गोष्टींचा अहिल्यादेवीनी विचार करून देशभर या गोष्टी उपलब्ध करून दिल्या.

आजच्या प्रत्येक सरकारने याचा आदर्श ठेवल्यास जनजीवन सुखी, समृद्ध होईल. वडाचे झाड हजार वर्ष उभे राहते. ते आपणास सावली देतेच पण पक्षांना आधार देते. वडाप्रमाणे पतीस दीर्घायुष्य लाभावे आणि या झाडाचे जतन होऊन, त्यांची संख्या वाढावी हाच खरा उद्देश वटसावित्रीचा आहे, असेही गुरुमाऊलींनी सांगितले.

Vat Purnima
Vat Purnima : वटपौर्णिमेला दारात काढा अशी खास रांगोळी, बघा डिझाइन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.