Success Story: वेदिकाने साकारले आईवडिलांचे स्वप्न! सार्वजनिक बांधकाम विभागात झाली कनिष्ठ अभियंता

जीवनात यशाची शिखरे गाठण्याची स्वप्ने उराशी बाळगून, त्या दिशेने झेपावण्यासाठी खडतर प्रवास अत्यंत धीरोदात्तपणे सोसून यशस्वी होणारे खूप कमी असतात...
Vedika Terle with her parents and grandparents.
Vedika Terle with her parents and grandparents.esakal
Updated on

चांदोरी : जीवनात यशाची शिखरे गाठण्याची स्वप्ने उराशी बाळगून, त्या दिशेने झेपावण्यासाठी खडतर प्रवास अत्यंत धीरोदात्तपणे सोसून यशस्वी होणारे खूप कमी असतात. असेच कौतुकास्पद व प्रेरणादायी यश निफाड तालुक्‍यातील शेतकरी कुटुंबातील मुलीने मिळविले आहे.

पालक आपल्या मुलांवर जितका विश्वास ठेवतात, त्यांनी तितकाच विश्वास आपल्या मुलींवरही ठेवावा. मुलगीही अधिकारी होऊ शकते. तिला संधी व पाठिंबा द्या. अधिकारी होऊन ती दोन्ही घराचे नाव उंचावू शकते, अशा भावना वेदिका टेर्ले हिने व्यक्त केल्या.

येथील टेर्ले शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वेदिकाचा प्रवास अत्यंत थक्क करणारा आहे. स्वत:ची जिद्द, परिश्रम व तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर ती सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंतापदी नियुक्ती झाली आहे.

वेदिकाचे माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले. पुढे क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदविका, तर गोखले अभियांत्रिकीमधून पदवी मिळविली. क. का. वाघ अभियांत्रिकीमधून पदव्युत्तर पदवी मिळवून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

१६ डिसेंबर २०२३ ला झालेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सरळसेवा परीक्षेतून सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता ‘गट ब’ या पदावर तिची निवड झाली. वेदिका लहानपणापासूनच हुशार आणि नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याची तिला आवड होती. घरातील सर्वच सदस्य शेती करत.

Vedika Terle with her parents and grandparents.
Success Story : निवाणेच्या ‘प्रसाद’ची पहिल्याच प्रयत्नात उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी!

वेदिकाची बुद्धिमत्ता व जिद्द बघून आजोबा व वडिलांनी तिला कायम प्रोत्साहन दिले. याही परिस्थितीतही एमई स्थापत्यपर्यंत उच्च शिक्षण वेदिकाने पूर्ण केले. परिस्थितीची जाण असलेल्या वेदिकाने शिक्षण पूर्ण करतानाच इतर अडचणींवर मात करीत प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय बाळगले.

अखेर परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम सरळसेवेच्या परीक्षेत यश मिळवून आईवडिलांसह कुटुंबियांची मान उंचावली. एवढ्यावरच तिचा प्रवास थांबणार नाही. मला समाजसेवा करायची आहे, अशी प्रतिक्रिया वेदिकाने दिली.

तिच्या यशात आई वर्षा, वडील विजय, आजी रंजना, आजोबा एकनाथ, भाऊ प्रत्युष, बहीण मधुरा यासह गणेश माळी व निशा गाडे यांनी वेळोवेळी मदत केली.

"ग्रामीण भागातील परीक्षार्थींना आता योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने संधी विस्तारित आहे. माझ्या यशात कुटुंबातील सदस्यांचा महत्त्वाचा वाटा आहे." - वेदिका टेर्ले

"गेल्या काही दिवसांत चांदोरीसह परिसरात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण चांगले असून, ही आनंददायी गोष्ट आहे."-सिद्धार्थ वनारसे, माजी जिल्हा परिषद सदस्य

Vedika Terle with her parents and grandparents.
UPSC Success Story : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'मुद्रा' बनली IAS अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.