Nashik News : वीर जवान सारंग अहिरे अनंतात विलीन; अखेरचा निरोप देण्यासाठी उसळला जनसागर

The crowd swelled in the funeral procession of Jawan Sarang Ahire.
The crowd swelled in the funeral procession of Jawan Sarang Ahire.esak
Updated on

जायखेडा (जि. नाशिक) : ‘अमर रहे अमर रहे, वीर जवान अमर रहे... वंदे मातरम्‌... भारत माता की जय’च्या घोषात जायखेडा (ता. बागलाण) येथील वीर जवान सारंग अहिरे यास स्राश्रु नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. बुधवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता बंधु रितेश यांनी सारंगला मुखाग्नी दिला. (Veer Jawan Sarang Ahire funeral Nashik News)

सारंग आसाममध्ये भारतीय सैन्य दलात सेवा बजावत होता. चार दिवसांपूर्वी रविवारी (ता. २५) कर्तव्यावर असताना त्याचा मृत्यू झाल्याचे संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत दूरध्वनीवरून आई- वडिलांना कळविण्यात आले. सारंगच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांसह नातेवाईक व संपूर्ण तालुका शोकसागरात बुडाला. चार दिवसांपासून सारंगचे पार्थिव आसामहून जायखेडा येथे येण्याची आतुरतेने वाट पाहत होते.

अखेर बुधवारी पहाटे सारंगचे पार्थिव जायखेडा येथे दाखल झाले. सकाळी ९ वाजता गावातून सजवलेल्या रथातून सारंगची अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी बागलाण तालुक्यातील माजी सैनिकांनी साखळी करत अंत्ययात्रेचे नियोजन केले. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यानंतर कृष्णाजी माऊली समाधीलगतच्या मोकळ्या जागेत सारंगला अखेरचा निरोप देण्यात आला.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

The crowd swelled in the funeral procession of Jawan Sarang Ahire.
Nashik News : नवीन वर्षात मिळणार Incovacc लस; नाकावाटे लशीला शासनाची मंजुरी!

या वेळी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे- पाटील, जायखेड्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, मुल्हेर येथील पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, नामपूरचे पोलिस उपनिरीक्षक तुषार भदाणे, प्रांत कार्यालयाचे प्रतिनिधी, मविप्र संस्थेचे संचालक डॉ. तुषार शेवाळे, नाशिक सैनिक कल्याण कार्यालयातील प्रतिनिधी, जायखेड्याच्या सरपंच शोभा गायकवाड, ग्रामसेवक किशोर भामरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

बागलाण तालुक्यातील माजी सैनिक संघटना, तलाठी बोरसे, माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार, जायखेडा सोसायटीचे अध्यक्ष निलेश पाटील, संचालक, कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकवृंद, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

The crowd swelled in the funeral procession of Jawan Sarang Ahire.
Nashik News: शालेय विद्यार्थ्यांना ई कचऱ्याचे धडे; पर्यावरण रक्षणासाठी नामांकित कंपनीचा अनोखा उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.