Nashik Vegetable Rate Hike : मेथीच्या जुडीला सोन्याचे मोल; गृहिणींचे बजेट कोसळण्याची शक्यता

For weeks there was a rush to buy leafy vegetables in the market
For weeks there was a rush to buy leafy vegetables in the marketesakal
Updated on

Nashik News : उन्हाच्या वाढत्या तडाख्याने बुधवारच्या आठवडे बाजारातून पालेभाज्या कमी झाल्या आहेत. पालक, शेपू काही प्रमाणात उपलब्ध असल्यातरी मेथीची जुडी दुर्मिळ झाल्याचे चित्र होते. (vegetable rate hike in nashik news)

त्यामुळे मेथीच्या जुडीसाठी चक्क पन्नास रुपये मोजावे लागत होते. कांद्याचे दरानेही तेजी गाठली असून चांगल्या प्रतीच्या किलोभर कांद्यासाठी पन्नास ते साठ रुपये मोजावे लागले. त्यामुळे आगामी काळात गृहिणींचे बजेट कोसळण्याची शक्यता आहे.

नवरात्रात अनेक महिला नऊ दिवसांचे उपवास करतात, त्यामुळे या काळात भाज्यांचे दर कमी होतात, असा अनुभव आहे. परंतु उन्हाच्या वाढत्या तडाख्याने पालेभाज्यासह सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या आवकेत मोठी घट झाली आहे. मात्र मागणी अधिक असल्याने भावांत तेजी आली आहे.

For weeks there was a rush to buy leafy vegetables in the market
Nashik MD Drug Case : ‘ड्रग्जमुळे’ भाडेकरूंचा मुद्दा ऐरणीवर; पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर

आठवडे बाजारात भेंडी साठ रुपये, तर गवार शंभर ते एकशेवीस रुपये किलो आहे. फ्लॉवर २० ते ३० रुपये, तर कोबी गड्डा पंधरा ते वीस रूपयांत उपलब्ध होता. हिरव्या मिरच्याही ऐंशी ते शंभर रुपये किलो दराने उपलब्ध होत्या. याशिवाय पालक, शेपूच्या जुड्या वीस रूपयांत उपलब्ध होत्या. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागातील कांदा चाळींचे मोठे नुकसान झाले.

अनेक भागातील शेतकऱ्यांच्या चाळीतील निम्‍म्यापेक्षा अधिक कांदा खराब झाला. त्यामुळे कांद्याच्या दरांत तेजी आहे. चांगल्या दर्जाच्या किलोभर कांद्यासाठी आठवडे बाजारात पन्नास ते साठ रुपये मोजावे लागत होते. लाल कांद्याला विशेष मागणी नव्हती तरीही तो तीस रुपये किलो दराने उपलब्ध होता.

For weeks there was a rush to buy leafy vegetables in the market
NMC News : डॉक्टरांची महापालिकेच्या सेवेकडे पाठ; वैद्यकीय विभागाची कसरत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.