इगतपुरी : सर्वपित्री अमावस्या जवळ येत असल्याने भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले आहेत. घोटी व इगतपुरी येथील आठवडे बाजारामध्ये आदिवासी बांधवांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. (Vegetable rates hiked during pitru paksha rate hike eating fenugreek coriander nashik)
आपल्या वंशजाचे कायमचे स्मरण राहावे, यासाठी पितृपंधरवड्यात श्राद्ध करण्याची प्रथा आहे. पितृपंधरावड्यात रोजच्या तुलनेत लागणाऱ्या भाज्यांची स्वयंपाकातील गरज वाढल्याने पालेभाज्यांचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
भेंडी आळू, लाल भोपळा, डांगर, मेथी गड्डी, गवार, कारले, गिलके, हिरवी मिरची, अळूची पाने या भाज्यांना पितृपंधरवड्यात महत्त्व आहे. या भाजीपाल्यांना मोठी मागणी वाढली आहे. महागाईमुळे पितृपंधरवडे घालण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे.
आवतण पद्धत बंद होऊन फक्त पाहुणे जेऊ घालण्यावर भर दिला जात आहे. पालेभाज्यांची मागणी वाढल्याने दरही कडाडल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले.
त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ पोहचत असली तरी शेतकरी बांधवांच्या खिशात चार पैसे यंदाच्या पितृपंधरावड्यात जादा जाणार हे माञ नक्कीच..
भेंडी : ५० ते ६० रुपये किलो
मेथी : ५० ते ६० रुपायाला गड्डी
लाल भोपळा : ४५ ते ५५ किलो
गवार : ७० ते ८० किलो
कारले : ६० ते ७० किलो
हिरवी मिरची : ६० ते ८० किलो
कोथिंबीर जुडी : ३० ते ६०
आळू पाने : २० ते ३० जुडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.