लॉकडाऊनमुळे भाजी विक्रेते वाढले खरे...पण हातगाड्यांच्या नशिबी मात्र प्रतीक्षाच

hatgadi 1.jpg
hatgadi 1.jpg
Updated on

नाशिक : लॉकडाउन सुरू होऊन 70 दिवस झाले आहेत. या 70 दिवसांत रोजगार गेलेले बहुतांश जण भाजी विक्रीकडेच वळले आहेत. पदवीधरापासून खासगी नोकरदारापर्यंत, रिक्षाचालकापासून तर मजुरापर्यंत ऊठसूट प्रत्येक जण भाजी विक्रीच्या धंद्यात उतरला आहे. त्यामुळे शहरात अचानकपणे भाजी विक्रेत्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र त्याच वेळी प्रशासकीय अडवणुकीच्या भीतीने हातगाड्यांना अजूनही अपेक्षित मागणी नाहीच...

अडवणुकीच्या भीतीने अजूनही हातगाडे घेण्यास अपसंती
संचारबंदीत भाजी विक्रीलाच परवानगी असल्याने रोजगार गमावलेली हजारो कुटुंबे भाजी विक्रीकडे वळाली आहेत. अडीचे ते तीनपटीने विक्रेत्यांची संख्या वाढूनही हातगाड्यांची संख्या मात्र जास्त वाढलेली नाही. संचारबंदीत प्रशासनाकडून अडवणुकीच्या भीतीने अजूनही हातगाडे घेण्यास पसंती नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. गारेगार, मटका कुल्फी या किरकोळ व्यवसायासाठी परराज्यातून विक्रेते येतात. त्यांच्याकडे हातगाडी नसते. कुठेतरी भाड्याने घर घेऊन राहतात. तेच विक्रेते फेब्रुवारी ते मे महिन्यात उन्हाळा व लग्नसराईत गाडे भाड्याने घेतात. 

अतिक्रमण पथकांची दहशत 
शहरात एकाच जागेवर गाडा लावून आणि गल्लोगल्ली फिरून अशा दोन पद्धतीने हातगाड्यांवर विक्री चालते. त्यात मध्य नाशिक भागात जागेवर वस्तू विक्रीत स्थानिकांचा सहभाग आहे, तर फिरून वस्तू विक्रेत्यांत परप्रांतीयांची संख्या जास्त आहे. फिरत्या विक्रेत्यांचे प्रमाण नाशिक रोड, सिडकोत जास्त आहे. त्यात, फळ, कुल्फी, मटका कुल्फी, घरगुती सामान, सौंदर्यप्रसाधनांसह किरकोळ साहित्य विक्रीसाठी आवाज देऊन साहित्य विकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे परप्रांतीय निघून गेल्याने फिरते हातगाडे जागेवर 
थांबून आहेत. मात्र एका जागेवर गाडा उभा करून विक्रीसाठी गाड्यांना मागणी आहे. गल्लोगल्ली फिरून भाजी विकताना अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून अडवणूक होण्याच्या भीतीने भाजी विक्रेत्यांकडून हातगाड्यांना पसंती मिळत नाही. हेही कारण सांगितले जाते. 

हातगाड्याचे अर्थकारण 
लॉकडाउन सुरू झाल्यापासून व्यवसाय बंद आहेत. परप्रांतीय निघून गेल्याने अनेकांनी त्यांचे हातगाडे विकले आहेत. काहींनी घरमालकाकडे जमा केले. भाडेतत्त्वार देणाऱ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले. एक हातगाडा पाच ते आठ हजार रुपयांत तयार होतो. दररोज 20 ते 25 रुपये रोजाने तो भाड्याने दिला जातो. महिन्यासाठी कुणी घेणार असतील तर 800 रुपये महिन्याने तो भाड्याने दिला जातो. त्यामुळे शक्‍यतो परप्रांतीय विक्रेतेच हातगाड्यांना पसंती देतात. स्थानिक नागरिक विक्रेते अजूनही 
हातगाड्यांकडे वळलेले नाहीत. 


लॉकडाउनमुळे परप्रांतीय जाताना त्यांच्याकडील हातगाडे जमा करून निघून गेले आहेत. त्यामुळे यंदा हातगाडे रस्त्यावर दिसत नाहीत. साधारण 50 हजारांच्या आसपास नुकसान झाले आहे. -किशोर गोसावी, हातगाडी भाड्याने देणारे व्यवासायिक 

लॉकडाउनपासून हा व्यवसाय ठप्प आहे. रोज 20 हातगाड्या भाड्याने द्यायचो. साधारण तीन महिने उन्हाळ्यात चांगले दिवस असायचे. मात्र यंदा ऐन सीझनमध्येच लॉकडाउन झाल्याने नुकसान झाले. -अख्तर सय्यद, हातगाडी भाड्याने देणारे व्यावसायिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.