Pitru Paksha: पितृपक्षात आवक वाढल्याने भाज्या स्वस्त! स्वच्छ वातावरणामुळे ताजा भाजीपाला उपलब्ध

lady buying vegetable
lady buying vegetableesakal
Updated on

Pitru Paksha : सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. त्यामुळे घरोघरी श्राद्ध होऊ लागले आहेत. पूर्वजांच्या स्मृतीस उजाळा देणाऱ्या पितृपक्षातील पंधरवड्यामुळे पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत.

श्राद्धाच्या जेवणासाठी सर्व प्रकारच्या भाज्यांची आवश्यकता असते. त्यात मुख्यत्व गवार, डांगर किंवा चक्की, कारले, गिलके, चवळी, भेंडी, अळूचे पान, दोडके या भाज्या तसेच वरणभात, भजे, खीर-पोळी, कढी आधी पंचपक्वानांनी भरलेला ताट घराच्या छतावर घेऊन कावळ्यांना आमंत्रित करून त्यांच्या करणी पितरांना भोजन दिले जाते.

अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. शेवटी पाऊस झाल्याने भाजीपाल्याची आवकही वाढली आहे. (Vegetables cheaper due to increase in income during Pitru Paksha Fresh vegetables available due to clean environment nashik)

वातावरण स्वच्छ झाल्याने भाजीपाल्यावर रोगकिडीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे पितरांसाठी लागणाऱ्या सर्व ताज्या भाज्या मिळत आहेत. पितरांच्या जेवणासाठी अनेक वस्तू स्वस्त झाल्याने महिलांनी समाधान व्यक्त होत आहे.

अग्नीला अन्न समर्पित करून आगारी देण्यात येते. श्राद्धासाठी भाऊबंदकतील नातेवाईक, मित्रमंडळींना जेवणाला बोलावले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी पंगती उठत आहेत.

वंशपरंपरेने चालत आलेली ही प्रथा आजही सुरू असून, अन्न पितरांपर्यंत पोहोचले का नाही, हा श्रद्धेचा भाग आहे. यानिमित्त हजारो घरातून एक ताट छतावर जात आहे.

lady buying vegetable
Pitru Paksha : चिंता नको, पितृपक्षात बिनधास्त खरेदी करा!

पितृपक्ष शुभ आहे की अशुभ, याबाबत अनेक गैरसमज आहेत. पंधरवड्यात कपडे शिवले जात नाही, शुभकार्य केले जात नाही, देवाची पूजा बंद असते.

सोशल मीडियावर धूम

सध्या मोबाईलचे युग असल्याने सोशल मीडियावर पितृपक्षाची धूम झाले. अनेकांनी पंधरवड्यात ‘काका फेस्टिव्हल’ जाहीर केला आहे. पितरांच्या जेवणासाठी मोबाईलवर अनेकांना आमंत्रित केले जाते. ग्रुप वेगवेगळ्या प्रकारचे कावळ्याचे छायाचित्र टिपून व्हॉट्सॲपवर पाहताना मिळत आहेत

lady buying vegetable
Pitru Paksha 2023 : कावळे गेले कुणीकडे, इथे नैवेद्य शिवण्यासाठी मिळतील पाळलेले कावळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.