Nashik Vegetable Rate Hike : आवक घटल्याने भाजीपाला तेजीत; अवकाळी पावसाचा परिणाम

उत्पादनही घटल्याचा परिणाम भाववाढीत झाला आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडत आहे.
Businessmen selling vegetables in Satana Naka area here.
Businessmen selling vegetables in Satana Naka area here.esakal
Updated on

Nashik Vegetable Rate Hike : येथील भाजीपाला बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून दरातही दुप्पटीने वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

त्यामुळे उत्पादनही घटल्याचा परिणाम भाववाढीत झाला आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडत आहे.(Vegetables price increase due to less production nashik news)

येथील भाजीपाला बाजारात भेंडी, गवार, गिलके, कारले, दोडके, कोबी, फ्लॉवर, वांगे, वाल, शेवगा, मेथी, पालक, कोथिंबीर यांची आवक पन्नास टक्क्यांनी घटली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होती. नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने मेथीची भाजी व इतर भाज्यांचे नुकसान झाले.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून येथे भाजीपाल्याच्या दरात दुपटीने वाढ झाली. येथे दिवसागणिक भाज्यांची आवक घटण्याचा अंदाज येथील व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. येथील बाजारात कसमादेसह चाळीसगाव व नांदगाव तालुक्यातून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे.

Businessmen selling vegetables in Satana Naka area here.
Vegetable Rate Hike : भाजीपाला कडाडला; गृहिणींचे बजेट कोलमडले

भाजीपाला दर असे.

सध्याचे -- गेल्या महिन्यातील

भेंडी - ८० - ६०

गवार - १२० - नीरंक

गिलके - १०० - ६०

कारले - ८० - ४०

दोडके - ८० - ५०

कोबी - ४० - २०

फुलावर - ८० - २०

वांगे - १०० - ४०

वाल - ८० - ४०

शेवगा - ८० - ५०

मेथी - २० - ८

शिमला - ८० - ४०

कोथिंबीर - ६० ते ८० रुपये किलो

Businessmen selling vegetables in Satana Naka area here.
Vegetable Rate Hike : आठवडे बाजारात सर्वच भाज्या खाताय भाव; कोथिंबीर, टोमॅटो, आल्याच्या दराने घेतली उसळी

''भाव मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली होती. अवकाळी पावसाने तोंडात आलेला घास हिरावून घेतला. शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी. त्यांना नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा मिळेल.''- कोमलसिंग ठोके, शेतकरी, वडगाव, ता.मालेगाव

''भाजीपाल्याचे भाव वाढल्याने विक्रीत घट झाली आहे. ग्राहक कमी प्रमाणात भाजीपाला खरेदी करतात. दिवसाला रोजही सुटत नाही. कमी भाव असलेल्या भाज्या खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे.''- चेतन अहिरे, भाजीपाला विक्रेता

Businessmen selling vegetables in Satana Naka area here.
Vegetable Rates Hike: पितृपंधरवड्यात भाजीपाल्यांचे दर कडाडले! मेथी, कोथिंबीर खातेय भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.