Summer Business : कडक उन्हातही भाजीपाला आवाक्यात; लग्नसराईमुळे आलं दोनशेपार!

Vegetable
Vegetable esakal
Updated on

Summer Business : उन्हाळा म्हटला की भाजीपाला, दुधाचे उत्पादन घटते. यामुळे सातत्याने या काळात भाजीपाला, फळभाज्यांची परवड होते. कडाक उन्हातही प्रथमच भाजीपाला आवाक्यात आहे.

विवाह तिथींमुळे फळभाज्यांना मागणी असूनही दर फारसे वधारले नाहीत. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. (Vegetables within reach even in summer Because of marriage ceremony ginger cross 200 price nashik news)

शेडनेट, अत्याधुनिक प्रयोग यामुळे फळभाज्या व भाजीपाल्याचे उत्पादन वाढल्याने भाव साधारण आहेत. लग्नसराईमुळे मोठी मागणी असल्याने आले मात्र २०० रुपये किलोपेक्षा अधिक झाले आहे. फळांपेक्षा आले महाग झाल्याने सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

आले सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने आले, वेलदोडेयुक्त चहाची चव चाखणे दुरापास्त झाले आहे. शेतमालाचे दर कोसळल्याने शेतकरी भाजीपाल्याकडे वळले. त्यातही विक्रमी उत्पादन झाल्याने उन्हाळ्याच्या शेवटीही आवक मोठी आहे.

यामुळे ग्राहकांना चांगल्या प्रतीचा भाजीपाला आवाक्यात मिळत आहे. यंदा शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे भाव घसरल्याने उत्पादकांनी केलेला खर्च वसूल झाला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vegetable
Nashik: झिरो पेन्डसी, सहकारी संस्था बळकटीकरणावर भर; जिल्हा उपनिंबधक फय्याज मुलानी यांनी स्वीकारली सूत्रे

भाजीपाल्याची आवक वाढल्याने तेही स्वस्त झाले आहेत. वांगे वगळता सर्वच भाजीपाला ६० रुपये किलोच्या आतच आहे.

भाजीपाला व फळभाज्यांचे किलोचे दर

वांगे- ८० रुपये, टोमॅटो- १० ते १५, गिलके, दोडके, गवार, मिरची- ६०, बटाटा- २५ ते ३०, फ्लॉवर- ४०, कोबी- ६०, शेवगा शेंगा, कारले, बीट, वाल- ८०, भेंडी- ६०, मेथी- १५ रुपये जुडी, पालक- २० रुपये जुडी, गवती चहा- ५ रुपये जुडी.

Vegetable
Tomato Price Fall : टोमॅटोला बाजारभाव नसल्याने उभ्या पिकात सोडली जनावरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.