Nashik Crime News : अबब... महिनाभरात सव्वादोन कोटींची वाहनचोरी! पोलिसांसाठी डोकेदुखी

सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली दुचाकी सुरक्षित राहील याची कोणतीही शाश्वती नाही, तशीच राहत्या घराच्या पार्किंगमधूनही दुचाकी चोरीला जात आहेत.
crime
crimeesakal
Updated on

Nashik Crime News : शहरात दुचाकी चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली दुचाकी सुरक्षित राहील याची कोणतीही शाश्वती नाही, तशीच राहत्या घराच्या पार्किंगमधूनही दुचाकी चोरीला जात आहेत.

गेल्या महिन्याभरात शहरातून चोरट्यांनी तब्बल २ कोटी २० लाखांच्या ७४ वाहनचोरी केल्या आहेत. (Vehicle theft worth two and half crore in month in nashik crime news)

सरासरी दिवसात दोन दुचाकी चोरीला जात असल्याने पोलिसांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. शहरात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. दुचाकी चोरट्यांनी अक्षरश धुमाकूळच घातला आहे. सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली दुचाकी सुरक्षित राहील याची शक्यता राहिलेली नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

अगदी राहत्या इमारतींच्या पार्किंगमधूनही हॅण्डल लॉक केलेल्या व सुरक्षितता असतानाही मध्यरात्रीच्या वेळी दुचाकी चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्या जात आहेत. जानेवारीमध्ये शहर हद्दीतून ७३ दुचाकी व एक सुपर कॅरी मिनी ट्रक चोरट्यांनी चोरून नेला आहे.

चोरट्यांनी महिनाभरात तब्बल २ कोटी २० लाख रुपयांची वाहने चोरून नेली आहेत. तक्रारदार दुचाकी चोरीची तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात गेल्यास तत्काळ ती नोंदवून घेतली जात नाही. तर दोन ते पाच दिवसांनंतर तक्रार नोंदवून घेतली जात असल्यानेही तक्रारदारांमध्ये नाराजी आहे.

crime
Nashik Crime News : बेरोजगार मित्राने उकळली मैत्रिणीकडून खंडणी; मुंबई नाका पोलिसात गुन्हा

सुरक्षेचे उपाय कुचकामी

वाहनचोरी रोखण्यासाठी वाहनचालकांकडून हॅण्डल लॉक असतानाही व्हील लॉक केले जाते. तसेच बऱ्याचदा इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहनाच्या व्हीलला साखळी लावून कुलूप लावले जाते. तसेच, अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये आता सीसीटीव्ही बसविलेले आहेत. असे असतानाही दुचाकी चोरीला आळा बसलेला नाही.

सार्वजनिक ठिकाणी तर चालक दुचाकी पार्क करून अवघ्या काही मिनिटांत परत आला असता दुचाकी चोरीला गेलेली असते. त्यामुळे वाहनचालकांकडून केल्या जाणाऱ्या सुरक्षेचे उपाय कुचकामी ठरत आहेत. चोरट्यांकडून चोरलेल्या दुचाकींची ग्रामीण भागामध्ये अगदी ५ ते १० हजारांमध्ये विक्री केली जाते.

ग्राहकाला कागदपत्रे आणून दिल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे सांगत दुचाकी चोरटे मिळेल, त्या किमतीत दुचाकी विकून पसार होतात. तर, काही चोरटे भंगारात विक्री करतात. दुचाकी चोर सापडल्यानंतर चोरीच्या दुचाकी जप्त केल्या जातात. भंगारवाला अवघ्या काही मिनिटात दुचाकीचा प्रत्येक पार्ट मोकळा करतो. त्यामुळे ती दुचाकी पुन्हा सापडण्याची शक्यताच राहत नाही.

crime
Nashik Crime News : बेरोजगार मित्राने उकळली मैत्रिणीकडून खंडणी; मुंबई नाका पोलिसात गुन्हा

पोलिस ठाणेनिहाय वाहनचोरी

सरकारवाडा - ३, पंचवटी - १२, म्हसरुळ - २, गंगापूर - ४, आडगाव - ६, भद्रकाली - ६, मुंबई नाका - ५, सातपूर - ७, अंबड - १२, इंदिरानगर -३, उपनगर - २, नाशिक रोड - ९, देवळाली कॅम्प - ३. एकूण : ७४

वर्षनिहाय वाहनचोरी

वर्ष - वाहनचोरी

२०२२ - ७१०

२०२३ - ८०४

२०२४ - ७४ (जानेवारीअखेर)

वाहनचोरी

दुचाकी - ५६

मोपेड - १२

रिक्षा - १

बुलेट - ३

इलेक्ट्रीक मोपेड - १

सुपर कॅरी (मिनी ट्रक) - १

एकूण : ७४

crime
Nashik Crime News : तडीपाराला गावठी कट्ट्यासह, 6 हल्लेखोरांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()