Nashik Crime News : वाहन चोरट्यांचा शहरात सुळसुळाट! अंबडमधून स्कॉर्पिओ अन् 7 दुचाकींची चोरी

crime
crimeesakal
Updated on

नाशिक : शहरातून वाहन चोरीच्या सपाटाच चोरट्यांनी लावला आहे. कामटवाड्यातून चार लाखांची स्कॉर्पिओ कारसह ७ दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या. (Vehicle thieves increasing in city Scorpio and 7 bikes stolen from Ambad Nashik Crime News)

अझरुद्दीन बिस्मिल्ला शहा (रा. मदिनानगर, वडाळा गाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची दुचाकी आणि दुचाकीच्या डिक्कीत असलेला १५ हजार रुपयांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने ३१ डिसेंबरला अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

संतोष अशोक बंदरे (रा. वैद्य नगर, पुणे रोड) यांची दुचाकी (एमएच- १५- बीई- २६७३) सोमवारी (ता. २) दुपारी तिवंधा चौकातील मेडिकल दुकानासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सुनील मनकर (रा. सातपूर) यांची दुचाकी (एमएच- १५- बीआर- ५५१९) अज्ञात चोरट्याने २३ डिसेंबरला राहत्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेली.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र भटू सैंदाणे (रा. हेगडेवारनगर, सिडको) यांची दुचाकी (एमएच- १५- इएन- ७४५०) २८ डिसेंबरला मध्यरात्री अज्ञात चोरट्याने राहत्या घरासमोरून चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तर, उपनगर हद्दीतून तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

crime
Crime News : आता ‘व्हाइट कॉलर’ खंडणीखोर!

विलास नामदेव उकार्डे (रा. बेलतगव्हाण) यांची दुचाकी (एमएच- १५- टी- ५१६७) व नरेंद्र सुरेश भालेराव यांची दुचाकी (एमएच- १५- बीएच- ४१६) आर्टिलरी सेंटर रोडवरील सत्यम स्पेअर पार्ट दुकानासमोरून २ जानेवारीला सायंकाळी चोरून नेली. तर, विशाल प्रवीण पाटील यांची दुचाकी (एमएच- १४- एआर- ४१७१) गाडेकर मळ्यातील गार्डनसमोर पार्क केली असता, चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच, ललित जनार्दन नेहेते (रा. देवेन कॉम्प्लेक्स, कामटवाडे) यांची स्कॉर्पिओ जीप (एमएच- १५- जीएक्स- १८३१) सोमवारी (ता. २) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

crime
Pune Crime News : नाना पेठेमध्ये कोयते दाखवत दहशत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()