नाशिक : पावसामुळे वाहने नादुरुस्त; गॅरेज व्यवसाय तेजीत

Bike garage latest monsoon marathi news
Bike garage latest monsoon marathi newsesakal
Updated on

नाशिक : संततधारेमुळे (Constant Rain) वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण मोठे असते. कधी-कधी तर भरपावसात वाहने नादुरुस्त झाल्याने वाहनचालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

मात्र, शहरातील वाहन दुरुस्ती करणाऱ्या गॅरेज व्यावसायिकांचा (Garage Bussiness) व्यवसाय सध्या तेजीत आहे. (Vehicles damaged due to rain Garage business is trending nashik latest Marathi news)

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून शहर-परिसरात पावसाची संततधार सुरू होती. जागरुक वाहनचालक पावसाळा सुरू होण्यापूर्वी वाहनांची सर्व्हिंसींग करून घेतात. त्यामुळे पावसात वाहन नादुरुस्त होण्याचे टाळले जाऊ शकते.

असे असले, तरी बहुतांशी वाहनचालक आपल्या वाहनाच्या नियमित देखभालीकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, ऐनवेळी वाहन नादुरुस्त झाल्यास त्याचा मोठा मनस्तापही त्यांना सहन करावा लागतो.

विशेषत: पावसाळ्यात वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण लक्षणीय असते. संततधार पाऊस असेल आणि दुचाकी पावसामध्येच उघड्यावर पार्क केली असेल, तर मात्र दुचाकी नादुरुस्त होण्याची दाट शक्यता असते. पावसाचे पाणी प्लगमध्ये जाते, तसेच कार्बोरेटरमध्येही पाणी जाऊन दुचाकी सुरू होत नाही.

सतत पाणी पडत असल्याने दुचाकीचे ऑन-ऑफ स्वीचही खराब होते. पावसाळ्यात दुचाकी वाहनांचे ब्रेक न लागण्याचा प्रकार होतात. यातही लायनर खराब असल्यास त्यात पाणी जाऊन ब्रेक लागत नाही. परिणामी, गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता असते.

पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढते. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे त्यात दुचाकी आदळते आणि त्यामुळे शॉक्ब दणका बसून खराब होण्याचे प्रमाण वाढते. चारचाकी वाहनांचीही वेळीच सर्व्हिंसींग केली नसेल, तर त्याही पावसाळ्यात नादुरुस्त होण्याची शक्यता असते.

यामुळे सध्या शहरातील गॅरेज व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत आहे. विशेषत: प्लग खराब होणे, कार्बोरेटरमध्ये पाणी जाऊन कचरा साचणे, इग्नेशियन कॉईल खराब होणे आदी दुरुस्तीसाठी सध्या गॅरेज व्यावसायिकांकडे वाहनांची गर्दी आहे.

Bike garage latest monsoon marathi news
Nashik : पेठ मध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन..

मोपेड, दुचाक्यांचे प्रमाण अधिक

पावसाळ्यात मोपेडची बॅटरी खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. मोपेड ॲटो स्वीचने सुरू होत नाही. बॅटरीच्या जॉईंटला कार्बन येते. त्यामुळे ती सुरू होत नाही. दुचाकींच्या प्लगमध्ये पाणी जाऊन ते खराब होतात.

अनेकांना पेट्रोल टाकीतही थोडे-थोडे पाणी जाते. त्यामुळे टाकीत पेट्रोलमध्ये पाणी साचल्याने दुचाकी सुरू होत नाहीत. यापासून बचावासाठी दुचाकी पावसात मधल्या स्टँडवर उभ्या कराव्यात. त्यामुळे, प्लग वा कॉर्बोरेटरमध्ये पाणी जात नाही.

पेट्रोलच्या लॉकवर पावसाळ्यात कव्हर बसवावे. त्यामुळे पाणी पेट्रोल टाकीत जात नाही. पावसाळ्यापूर्वी ब्रेक लायनर बदलून घ्यावेत. त्यामुळे ब्रेक न लागता होणारे अपघात रोखता येतात. दुचाकींचे टायर गुळगुळीत झाले असतील तर ते बदलून घ्यावेत. त्यामुळे पावसामुळे दुचाकी स्लीप होणार नाही.

"दुचाकींची नियमित सर्व्हिंसींग करणे आवश्‍यक आहे. पावसाळ्यामुळे ब्रेक लायनर, ऑईल तपासून घ्यावे. पावसात दुचाकी पार्क करू नये. केल्यास मधल्या स्टॅण्डवर लावावी. त्यामुळे प्लग व कॉर्बोरेटरमध्ये पाणी जात नाही. पावसात वाहनाच्या सायलन्सरपर्यंत पाणी असलेल्या ठिकाणावरून वाहने नेऊ नये. नाही तर सायलन्सरमध्ये पाणी जाऊन ते बंद पडण्याची शक्यता असते." -सतीश वाघ, मातोश्री गॅरेज

Bike garage latest monsoon marathi news
विद्यार्थ्यांनी दिली 'NEET' परीक्षा; 5 टक्के विद्यार्थी गैरहजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.