Nashik News : शहर आयुक्तालयात काही महिन्यांपूर्वी नवीन चारचाकी वाहने मिळाली. परंतु ती वाहने गस्ती पथकाला देण्याऐवजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली आणि जुनी वाहने गस्ती पथकांना देण्यात आली.
यातील बहुतांशी वाहनांचा बोजवारा उडाला असल्याने ती वाहने चालविणेच जिकिरीचे आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा पाठलाग करताना ही वाहने नादुरुस्त होत असल्याच्या घटना गेल्या महिन्यात दोनवेळा घडल्या आहेत.
नुकतीच धोंगडे मळ्यातील वाहन तोडफोड प्रकरणी गुन्हेगारांचा पाठलाग करणारे गस्ती वाहन ऐन मोक्याच्या क्षणी नादुरुस्त झाल्याचे समोर येते आहे.
त्यामुळे गस्तीवरील वाहनांची वेळीच दुरुस्ती वा नवीन वाहने देण्याकडे वेळी लक्ष देण्याची गरज व्यक्त होते आहे. (vehicles of patrol squads need repair at strategic moments Need to give new vehicles to police officers nashik news)
शहर पोलिस आयुक्तालयासाठी गेल्या मार्च महिन्यात नवीन २१ चारचाकी वाहने मिळाली होती. सदर वाहने पोलिस ठाणे आणि विशेष पथकांसह गस्ती पथकांना देण्यात येणार असल्याचे नियोजित होते.
परंतु प्रत्यक्षात नवीन वाहने पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देण्यात आली. तर त्यांनी वापरलेली वाहने पोलिस ठाण्यांच्या गस्ती पथकांना देण्यात आली आहेत.
मूळात वाहने जुनी असल्याने ती वाहने अत्यंत सुस्थितीत नाहीत. वेगाची मर्यादा असून, काही वाहने कधी बिघाड होतील याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे गेल्या महिन्यात दोन घटनांमध्ये तसा अनुभवही आलेला.
तर बहुतांशी वाहने ही दुरुस्तीवर आलेली आहेत. परंतु त्यांची कामचलाऊ दुरुस्ती करून त्यांचा वापर केला जात आहे. दुरुस्तीला मुख्यालयात वाहन विभागात दिलेले वाहन परत कधी मिळेल याचीही शाश्वती नसते.
त्यामुळे बऱ्याचदा पोलिस ठाण्यांच्या पातळीवरच या वाहनांची दुरुस्ती केली जाते. मात्र, ही वाहने वापरताना वा गुन्हेगारांचा पाठलाग करताना उपयुक्त नसल्याचे अनेकदा समोर आलेले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
‘त्या’ दोन घटना
गेल्या तीन जुलैला पहाटे म्हसरूळ हद्दीतील किशोर सूर्यवंशी मार्गावरील एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करीत असताना पोलिस गस्ती वाहनाचे एक्सेलच तुटले आणि गस्ती वाहन डीपीवर जाऊन धडकले.
या घटनेत संशयित गंभीररीत्या जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला होता. तर, दोन दिवसांपूर्वी नाशिक रोडला धोंगडे मळ्यात वाहनांची तोडफोडची घटना कळाल्यानंतर पोलिस गस्ती वाहन संशयितांच्या मागावर असतानाच ऐन मोक्याच्या क्षणी वाहनाची क्लच प्लेटच तुटली. त्यामुळे गस्ती वाहनाच्या समोरून संशयित दुचाकीवरून पसार झाले होते.
आयुक्तालयातील वाहने
शहर आयुक्तालयात २०० चारचाकी वाहने, १०० दुचाकी आहेत. याशिवाय नव्याने २१ चारचाकी वाहने मिळालेली आहेत. तर, डायल ११२ पथकासाठी ७ वाहने देण्यात आलेली आहेत.
अशा एकूण ३२८ वाहने आयुक्तालयाकडे आहेत. तर, यापैकी सुमारे ७० ते ८० वाहने नादुरुस्त आहेत. नवीन वाहने वगळता बहुतांशी वाहने धावत असली तरी त्यांची क्षमता भरधाव वेगात धावतील अशी नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.