Nashik Crime News : देवळालीगावात गाड्यांची तोडफोड; 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात

देवळाली गावात रात्री एकच्या सुमारास काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण केली.
Cars vandalized by suspects.
Cars vandalized by suspects.esakal
Updated on

Nashik Crime News : देवळाली गावात रात्री एकच्या सुमारास काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. मागील भांडणाची कुरापत काढून एकाला मारण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयित आरोपींनी परिसरात दहशत माजविली.

याबाबात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. (vehicles vandalized in Devalaligaon nashik crime news)

आतिश सोन्याबापू जंगम, तसेच पत्नी कविता भाऊ चिवराज जंगम, आई लता जंगम व दोन लहान मुले हे सर्वजण झोपलेले असताना सोसायटीमधून बाहेरून मोठमोठ्याने शिवीगाळ करीत ‘ये बाहेर ये, आम्हाला दम देतो का’ असे आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता परिसरात राहणारे गुरुज भालेराव, अश्रफ मणियार, साहिल नायर तसेच त्यांचे सोबत असलेले इतर तीन ते चार लोक हातात कोयते, तलवार व लोखंडी रॉड घेऊन आबा पवार यांच्या घराचा दरवाजा तोडून शिवीगाळ करीत होते.

त्यांनी आबा पवार यांच्या घरात प्रवेश करून आतील सामानाची तोडफोड केली. घरात कोणी नसल्याने ते खाली आले. त्यांचे हातातील कोयत्याने त्यांनी घरासमोर पार्क केलेली वाघोली यांची पिक-अप, तसेच किशोर सिसोदे यांची (एमएच १५, बीएक्स १०१९) वारना चारचाकी गाड्याच्या काचा फोडून नुकसान केले.

काही महिन्यांपूर्वी देवळालीगाव, महात्मा गांधी पुतळ्याजवळ सलूनमध्ये एकावर हल्ला करण्यात आला होता. आबा पवार त्याप्रकरणी साक्षीदार होते. संशयित एक दिवसापूर्वीच जेलमधून सुटला आणि पुन्हा दहशत माजविण्याचा प्रकार केला.

Cars vandalized by suspects.
Nashik Crime News : कुरकुरे घेण्याच्या बहाण्याने येत 20 ग्रॅमची सोनपोत ओरबाडली

संशयित आरडाओरडा करीत व्यवहारे यांच्या बिल्डिंगकडे निघून गेले. जाताना त्यांनी गल्लीत पार्क केलेल्या अॅक्टिव्हा मोपेड (एमएच १५, जेजे ६१२४), अॅपेरिक्षा (एमएच १५, जेए ०१५६), अॅक्टिव्हा मोपेड (एमएच १५, एफएल ४६४५), अॅक्टिव्हा मोपेड (एमएच १५, सीआर ७५५९), बजाज बॉक्सर (एमएच १५, एआर ०३७७), स्पार्क मोटारकार (एमएच ०३, एआर ८८७३), डी.ओ. मोपेड (एमएच १५, जीझेड ९०६१)

ज्युपिटर मोटारसायकल (एमएच १५, जेएन ८०५९), स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच १५, सीजे ६६०२), स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच १५, एव्ही ४१४६), स्प्लेंडर मोटारसायकल (एनएच ४८, एएस १६९६), एचएफ डीलक्स मोटारसायकल (एनएच १५, ईएन ४४२४) व रिक्षा (एमएच १५ ईएच ०१७२) या वाहनांच्या काचा फोडून नुकसान गेले.

तोडफोड प्रकरणी अतिश सोन्याबापू जंगम, किशोर शिसोदे, बाळासाहेब जंगम, तुषार शिंदे, अशोक शिरोडे, जगदीश वाघोले यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात संशयित आणि त्यांचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांनी व पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली.

उपनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी, पोलिस उपनिरीक्षक अतुल पाटील, पोलिस शिपाई जयेश शिंदे, सतीश मढवई यांच्या मदतीने अजिम मुजम्मिल शेख, फरहान जमीर खान व साहिर निसार नायर या तीन मुख्य संशयितांसह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. पोलिसांनी नाशिक रोड व देवळाली गाव भयमुक्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

Cars vandalized by suspects.
Nashik Crime News : बंदी झुगारून नायलॉन मांजा विक्री भोवली; 42 जण तडीपार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.