नाशिक : शहरातील बेशिस्त वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर टोईंगच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई सुरू होती. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या तर सुटली नाही, उलट वाहनचालक, वाहतूक पोलीस आणि टोईंग कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग नेहमीच घडायचे.
त्यातून अनेकदा हमरीतुमरीच्या घटनाही घडलेल्या होत्या. तसेच, गेल्या मार्च २०२२ मध्ये तत्कालिन पोलीस आयुक्तांनी टोईंग ठेक्याला दिलेल्या मुदतवाढीला विद्यमान पोलीस आयुक्तांनी वाढीव मुदत न देता ठेका रद्द केला आहे.
असे असले तरी नो-पार्किंगमधील वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नो-पार्किंगमध्ये वाहने पार्क न करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. (Vehicles will be torn E Chalan in no parking Vehicle towing contract finally cancelled Nashik News)
शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील नो-पार्किंगमधील वाहनांची टोईंग कारवाई करण्यासाठी श्रम साफल्य सर्व्हिसेसला वाहनांची टोईंग करण्याचा ठेका देण्यात आलेला होता. तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी गेल्या ७ मार्च २०२२ रोजी श्रम साफल्य सर्व्हिसेसला मुदतवाढ दिली होती.
वाहनांच्या टोईंग करताना नेहमीच वादावादीचे प्रसंग घडत होते. तक्रारदार वाहनचालकांच्या वाहनांचेही बऱ्याचदा नुकसान होत होते. तसेच, टोईंग कारवाईतून शहरातील वाहतूक कोंडीचीही समस्या सुटण्यास मदत होत नव्हती. त्यामुळे विदयमान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी टोईंगच्या कारवाईच्या आदेशात अंशत: बदल केला आहे.
हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
पोलीस आयुक्त शिंदे यांच्या नवीन आदेशानुसार, श्रमसाफल्य सर्व्हिसेसचा ठेका रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून शहरात दुचाकी वा चारचाकी वाहनांचे टोईंग होणार नाही.
मात्र, वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदारामार्फत शहरातील नो-पार्किंगमधील वाहनांविरोधात ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी शहरात नो-पािर्कंगच्या ठिकाणी आपली वाहने पार्क न करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आलेले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.