त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौकापर्यंत नव्याने तयार होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून भाजप व शिवसेनेत रंगलेला कलगीतुरा अद्याप संपुष्टात येत नाही.
नाशिक : त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौकापर्यंत नव्याने तयार होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून भाजप व शिवसेनेत रंगलेला कलगीतुरा अद्याप संपुष्टात येत नाही. महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांनी विकासकामांना निधी अपुरा पडत असल्याने पुलाचे काम थांबविण्याचे पत्र दिल्याने शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी संताप व्यक्त केला. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर काम थांबविता येत नसल्याचा कायदेशीर डोस देताना, काम थांबवू शकत नाही. थांबल्यास राजकारण सोडेन, असे आव्हान महापौरांना दिले आहे. (Verbal dispute between Sudhakar Badgujar and Mayor Satish Kulkarni over credit for flyover work)
पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने त्यापूर्वी राजकीय पडसाद उमटायला सुरवात झाली आहे. त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथे दोन प्रत्येकी सव्वाशे कोटी रुपये किमतीचे दोन उड्डाणपुलाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. संबंधित कामाच्या कार्यारंभ आदेश दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयुक्तांना एप्रिल महिन्यात पत्र लिहून विकासकामांसाठी निधी अपुरा पडण्याची शक्यता लक्षात घेत दोन्ही पूल रद्द करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने शिवसेनेचे महानगरप्रमुख व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी महासभेत महापौर कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला. त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपूल या भागासाठी महत्त्वाचा असून, पुलाचे काम थांबविणे योग्य नाही. कामाचे कार्यारंभ आदेश दिले असल्याने अशा प्रकारे काम बंद करता येत नाही. महापौरांनी काम थांबवून दाखवावे, काम थांबल्यास मी राजकारण सोडेन असे आव्हान दिल्याने या निमित्ताने भाजप विरुद्ध शिवसेना असे निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्याचे मानले जात आहे. उड्डाणपूल कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने यापूर्वी वाद झाला होता. भाजपकडून दोन्ही उड्डाणपुलांचे श्रेय घेतले जात असताना खासदार हेमंत गोडसे यांनी यापूर्वी केलेल्या मागणीच्या पत्राचा आधार घेत शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे पूल होत असल्याचा दावा केला होता. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला होता.
एखाद्या कामाचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर ते काम थांबविता येत नाही. असे असताना महापौर कुलकर्णी यांनी काम थांबविण्याचे पत्र आयुक्तांना देणे चुकीचे आहे. काम थांबवू शकत नाही, तसे झाल्यास मी राजकारण सोडेन.
- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना.
(Verbal dispute between Sudhakar Badgujar and Mayor Satish Kulkarni over credit for flyover work)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.