नाशिक : अनुकंपाधारकांची रिक्त असलेली पदे शैक्षणिक अर्हतेनुसार तातडीने भरण्यासाठी संबंधित विभागांनी प्रतीक्षा यादी तयार करून जिल्हा समितीकडे पाठविण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील ११८ अनुकंपधारकांच्या कागदपत्रांची तपासणी करून यादी तयार करण्यात आली. मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यास ही भरती प्रक्रीया राबविली जाईल. (Verification of Documents of Candidates on Compassion 118 candidates waiting Nashik ZP News)
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याच्या शासनाच्या अनुकंपा तत्त्व धोरणाची अंमलबजावणी गत चार वर्षांपासून करण्यात आलेली नव्हती. या काळात जवळपास २९६ पेक्षा अधिक मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांनी नोकरीसाठी अर्ज केले होते. मात्र भरतीवर निर्बंधामुळे कार्यवाही झालेली नाही. दरम्यानच्या काळात अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळण्याच्या आशेवर असलेल्या उमेदवारांचा धीर सुटत चालला होता.
यातील काहींची वयोमर्यादा संपुष्टात येण्याची चिन्हे होती. हमखास नोकरी मिळण्याच्या अपेक्षेमुळे दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करण्यातही अडचणी निर्माण होत होत्या. दुसरीकडे रिक्त पदे असतानाही अनुकंपाधारकांची पदे भरली जात नव्हती. त्यानुसार शासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या निर्देशानुसार पालकमंत्र्यांनी यादी तयार करण्याची सूचना दिली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.