Nashik PESA Teacher : पेसातील पदवीधरांच्या कागदपत्रांची पडताळणी; जिल्ह्यातून दोनशेवर शिक्षक उपस्थित

Qualified candidate teacher in profession field in presence in Government Girls School auditorium for document verification
Qualified candidate teacher in profession field in presence in Government Girls School auditorium for document verification esakal
Updated on

Nashik PESA Teacher : जिल्ह्यातील आदिवासी तालुका (पेसा) क्षेत्रातील शिक्षक पदभरतीच्या वेळापत्रकानुसार शनिवारी (ता.१६) शासकीय कन्या शाळेत प्राथमिक शिक्षण विभागाकडून यादीतील पात्र ठरलेल्या दोनशेहून अधिक पदवीधर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. (Verification of documents of graduates in Pesa nashik news)

यात अपूर्णता असलेल्या, गैरहजर असलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. सोमवारी (ता.१८) तीनशे उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी सांगितले.

पेसा शिक्षक भरतीची यादी राज्यस्तरावरून प्राप्त झाली आहे. वेळापत्रकानुसार यादीमधील पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीस शनिवारी (ता.१६) सुरवात झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Qualified candidate teacher in profession field in presence in Government Girls School auditorium for document verification
PESA Teacher Recruitment : पेसा शिक्षक भरतीसाठी समांतर आरक्षण जाहीर; शिक्षकांच्या जि. प. वर धडकेनंतर कार्यवाही

शासन आदेशाप्रमाणे दाखले आहेत की नाही, गुणपत्रक, जात प्रमाणपत्र तसेच समांतर आरक्षणाबाबत पडताळणी नेमण्यात आलेल्या समितीने केली.

पहिल्या टप्यात पदवीधर शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. सोमवारी पदवीधर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यासाठी तीनशे उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. शनिवारी गैरहजर असलेल्यांना २० सप्टेंबरनंतर पडताळणीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे बच्छाव यांनी सांगितले.

Qualified candidate teacher in profession field in presence in Government Girls School auditorium for document verification
PESA Teacher Recruitment : पेसा शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर; 16 व 18 ला कागदपत्रांची पडताळणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.