Nashik ZP News: जि. प. मध्ये सर्वत्र शुकशुकाट... विभागप्रमुख तालुक्याला, कर्मचारी मोर्चात, जणू सुटीचाच माहोल

Nashik ZP News
Nashik ZP News esakal
Updated on

Nashik ZP News: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार मंगळवारी (ता.12) मुख्यालयातील विभागप्रमुख तालुका दौ-यावर गेले होते.

दुसरीकडे जुनी पेन्शन योजनेसाठी मोर्चासाठी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी नागपूर येथे गेलेले असल्याने जिल्हा परिषदेत सुट्टीचा माहोल होता. विभागांमध्ये मोजकेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (very few employees present in zp nashik news)

त्र्यंबकेश्वर पंचायत समितीत शासकीय कार्यालय उघडण्याची वेळ होऊनही पंचायत समिती बंद असल्याचे निर्देशनास आले होते. या प्रकारानंतर श्रीमती मित्तल यांनी मुख्यालयातील सर्व विभागप्रमुखांना फिल्डवर उतरविले आहे. श्रीमती मित्तल यांनी विभागप्रमुखांची प्रत्येक तालुक्यास ‘तालुका पालक अधिकारी’ म्हणून नेमणूक केली.

या अधिकाऱ्यांनी दर महिन्याच्या दुस-या मंगळवारी तालुक्यात जाऊन, केंद्र व राज्य शासन यांच्याकडून लोकोपयोगी व कल्याणकारी विविध योजना, अभियान अंमलबजावणीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. यानुसार मंगळवारी मुख्यालयातील एक दोन वगळता सर्व विभागप्रमुख दिलेल्या तालुक्यात गेले होते.

दुसरीकडे कर्मचा-यांची उपस्थिती नगण्य दिसत होती. नागपूर येथे विधिमंडळावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा होता. त्यासाठी जिल्ह्यातून मोठया प्रमाणात कर्मचारी मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेले आहेत.

Nashik ZP News
Nashik Winter Update: जिल्ह्यात थंडीचा तडाखा वाढला; धुक्यामुळे शेतीची चिंता वाढली

विभागप्रमुख नाही, कर्मचारी टेबलावर हजर नाहीत, त्यामुळे मुख्यालयात जणू सुट्टीचा माहोल दिसत होता. बहुतांश कर्मचारी टेबलावर नसल्याचेही दिसून येत होते. याचा परिणाम कामकाजावर झालेला दिसत होता.

बुधवारी बैठकांचे नियोजन

विभागप्रमुखांना दुसऱ्या मंगळवारी तालुका दौऱ्यावर जाण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्य माहिती आयोगाची आज सुनावणी होती. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती याबाबतच्या याचिकांवर सुनावणी होती.

त्यामुळे दिंडोरी, निफाडसह काही तालुक्यांचे गटविकास अधिकारी सुनावणीसाठी नाशिकमध्ये उपस्थित होते. त्यामुळे अनेक तालुक्यात गटविकास अधिकारी नसल्याने विभागप्रमुख गेले नव्हते. त्यांनी बुधवारी (ता.13) बैठका घेण्याचे नियोजन केले आहे.

Nashik ZP News
Nashik News: पोषण आहारापासून 3 लाख बालके वंचित; अंगणवाडी सेविका, मदतनीस संपाचा परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.