NMC News : राज्यात सत्ताधारी पक्षाकडून ट्रिपल इंजिन सरकारचा उल्लेख विकासाच्या अनुषंगाने केला जातो. परंतु नाशिकमध्ये ट्रिपल इंजिनच्या सरकारमधील काहींना विकासाऐवजी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये इंटरेस्ट असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेचे वादग्रस्त डॉ. राजेंद्र भंडारी यांना पुन्हा वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार देण्यासाठी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून नियमानुसार वैद्यकीय अधिक्षक पदावर नियुक्तीची शिफारस केली आहे. (Vice Chairman zirwal recommendation to transfer of controversial rajendra Bhandari Interest in triple engine government in nmc transfers nashik political news)
महापालिकेचेच वैद्यकीय अधिकारी व तत्कालीन बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ. भंडारी यांच्या मालकीच्या खासगी रुग्णालयात अनधिकृतपणे सोनोग्राफी यंत्र आढळले.
नाशिक रोड येथील देवळालीगाव परिसरात श्री बालाजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत हे अनधिकृत सोनोग्राफी मशिन आढळले. ज्या रुग्णालयात यंत्र आढळले, त्या रुग्णालयाची इमारत डॉ. भंडारी यांच्या मालकीची असल्याची बाब समोर आली.
महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी मशिनसह रुग्णालय सील केले. त्यानंतर या प्रकरणात डॉ. भंडारी दांपत्यासह ९ डॉक्टरांसह ११ जणांविरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत नाशिक रोड न्यायालयात खटला दाखल केला.
त्यानंतर वैद्यकीय विभागाने डॉ. भंडारी हे महापालिकेच्या वैद्यकीय सेवेत असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव प्रशासन उपायुक्तांकडे दाखल केला. डॉ. भंडारी यांच्या कृतीमुळे नागरिकांमध्ये महापालिकेची प्रतिमा मलिन केली, महापालिकेच्या सेवेत असतानाही खासगी व्यवसाय करणे आणि अवैधरीत्या सोनोग्राफी मशिन बाळगणे, असे तीन आरोप त्यांच्यावर ठेवले आहे.
याप्रकरणी चौकशी प्रलंबित असतानाच डॉ. भंडारी यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार सोपविल्याने नवा वाद निर्माण झाला. महापालिका आयुक्त पदाचा नव्याने कार्यभार स्वीकारलेले डॉ. अशोक करंजकर यांनी फेरबदल करताना डॉ. भंडारी यांच्याकडून पदभार काढून घेत डॉ. नितीन रावते यांच्याकडे सोपविला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आता पुन्हा त्याच पदावर बसण्यासाठी डॉ. भंडारी यांची धडपड सुरू असून, थेट विधानसभा उपसभापतींनी आता त्यांची शिफारस केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
काय केलीय शिफारस?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आलेल्या शिफारस पत्रात म्हटले की, डॉ. राजेंद्र भंडारी यांना आरोग्य अधिकारी या पदावर नाशिक महापालिकेत सेवाज्येष्ठतेने नेमणूक देण्यात आली होती.
परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्यांच्याकडून सदर कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या विनंतीनुसार सहानुभूतिपूर्वक विचार करून नियमानुसार कार्यवाही करण्याची शिफारस करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.